संजय गांधी निराधार योजनेसाठी तर्पण फाऊंडेशनसमवेत करार.

संजय गांधी निराधार योजनेसाठी तर्पण फाऊंडेशनसमवेत करार.

संजय गांधी निराधार अंतर्गत शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक नागरिक उत्सुक असतात ते ये योजनेसाठी अर्ज करत असतात. आता संजय गांधी निराधार योजनेच्या अमलबजावणीसाठी शासनाने  तर्पण फाऊंडेशनसमवेत करार केला आहे.

यामुळे हि योजना अधिक गतिमान होऊन पात्र लाभार्थ्यांना लवकर या योजनेचा लाभ मिळू शकेल. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

अनेक प्रयत्न करून देखील या योजनांचा लाभ अशा नागरिकांना मिळत नाही. यापुढे अनाथांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाच्या वतीने तर्पण संस्थेची मदत घेतली जाणार आहे.

तर्पण संस्थेअंतर्गत अनाथांना योजनेचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. तर्पण फाउंडेशन यासाठी कोणतेही शुल्क आकारणार नाही.

बैठकीमध्ये घेण्यात आला निर्णय

या संदर्भात १० जानेवारी २०२३ रोजी एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये योजना अंतर्गत अनाथांना लाभ मिळवून देण्यासाठी तर्पण फाउंडेशनला मान्यता देण्यात आलेली आहे.

केवळ सामाजिक बांधिलकी विचारात घेऊन तर्पण संस्था काम करणार आहे, अशी माहिती सामाजिक न्याय विभागाने दिली दिलेली आहे.

 तर्पण संस्थेसोबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच महसूल व वन विभाग यांचेमार्फत त्रिपक्षीय करारनामा होणार असून सदर करारनामा प्रथम ८ वर्षाकरीता असेल.

योजना संदर्भातील खालील व्हिडीओ पहा.

त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच महसूल व वन विभाग संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतील. संस्थेचे काम समाधानकारक असल्यास पुढील ७ वर्ष कालावधीसाठी मुदतवाढ देऊ शकतील, अशी माहिती सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

संजय गांधी निराधार योजना संदर्भातील माहिती

या योजना अंतर्गत अशा नागरिकांना लाभ मिळतो ज्यांचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त आहे.

तुम्ही ज्या तालुक्यातील असाल त्या तालुक्याच्या ठिकाणी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी एक समिती गठीत केलेली असते.

तुमची संपूर्ण व्यवस्थित माहिती भरलेली फाईल या समितीकडे तपासणीसाठी पाठविली जाते. या समितीने मान्यता दिली कि मग पुढील कार्यवाहीस सुरुवात होते.

अधिकृत माहिती लिंक

समितीच्या नियम व अटीनुसार अर्जदाराने अर्जामध्ये सादर केलेली माहिती योग्य असेल तर अर्जदार या योजनेसाठी पात्र होत असतो. अर्जदाराचा अर्ज जर बाद झाला तर जी कागदपत्रे कमी पडलीत ती परत जमा करून या योजनेसाठी तुम्ही पुन्हा अर्ज सादर करू शकता.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जर या योजनेची pdf फाईल हवी असेल तर खालील बटनावर क्लिक करा.

खालील लिंकवर क्लिक केल्यावर तुम्ही दसऱ्या पेजवर जाल. या ठिकाणी तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी pdf फाईल व इतर माहिती मिळेल.

येथे क्लिक करा.

कसा मिळेल योजनेचा झटपट लाभ?

शासनाचा तर्पण फाऊंडेशनसमवेत करार झाल्याने संजय गांधी निराधार योजनेस गती मिळू शकते.

संजय गांधी निराधार योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात?

लाभार्थी किंवा अर्जदाराचा रंगीत छायाचित्र. ओळखीचा पुरावा म्हणून १ पासपोर्ट २ पॅन कार्ड ३ आधार कार्ड ४ मतदान कार्ड यापैकी एक पुरावा द्यावा लागेल. तहसीलदार किंवा तलाठी यांची स्वाक्षरी असलेले रहिवासी प्रमाणपत्र

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ कसा घ्यावा?

योजनेचा लाभ कसा घ्यावा या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. लेख पूर्ण वाचा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *