1 रुपयात पिक विमा नोंदणी शेतीसाठी 12 तास दिवसा लाईट शेतकऱ्यांना प्रती वर्ष मिळणार 12 हजार रुपये

1 रुपयात पिक विमा नोंदणी शेतीसाठी 12 तास दिवसा लाईट शेतकऱ्यांना प्रती वर्ष मिळणार 12 हजार रुपये

1 रुपयात पिक विमा नोंदणी शेतीसाठी 12 तास दिवसा लाईट शेतकऱ्यांना प्रती वर्ष मिळणार 12 हजार रुपये पहा सविस्तर माहिती.

पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पानी फाऊंडेशनतर्फे सत्यमेव जयते फार्मर कप पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा नेहमीच अशा प्रकारची मागणी शेतकरी बांधवांकडून करण्यात येते. त्यामुळे आता शेतीसाठी दिवसा विज पुरवठा केला जाणार असल्याची माहिती महराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात दिली आहे.

नैसर्गिक शेतीमुळे जर शेत पिकांचे नुकसान झाले तर शेतकरी बांधव त्यांच्या शेतातील पिकांचा पिक विमा काढत असतात. पिक विमा काढण्यासाठी शेतकरी बांधवाना पिक विमा नोंदणीसाठी पैसे मोजावे लागतात. परंतु आता लवकरच केवळ १ रुपयात पिक नोंदणी केली जाणार असल्याची माहिती देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात बोलतांना दिली आहे.

केवळ १ रुपयात पिक विमा निघणार असल्याने शेतकऱ्यांना आता विमा हफ्ता भरण्याची गरज राहणार नाही.

पुढील माहितीपण वाचा उद्योगासाठी 15 लाख कर्ज मिळणार अर्ज करण्याचे आवाहन

प्रतिवर्ष शेतकरी बांधवाना मिळणार १२ हजार रुपये.

शेतकरी बांधवांसाठी केंद्र शासनाची ज्या प्रकारे पीएम किसान सन्मान योजना आहे अगदी त्याच धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 6 हजार रुपयांसोबत राज्य शासनही 1 कोटी 12 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 6 हजार रुपये टाकणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे.

जर 1 रुपयात पिक विमा नोंदणी होत असेल तर हि नक्कीच शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे.

या संदर्भातील अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *