पिक विमा मिळण्याची तारीख फिक्स या तारखेपर्यंत मिळणार पिक विमा

पिक विमा मिळण्याची तारीख फिक्स या तारखेपर्यंत मिळणार पिक विमा

पिक विमा मिळण्याची तारीख संदर्भात जाणून घेवूयात संपूर्ण माहिती या लेखामध्ये.

अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवाना २०२२ मध्ये झालेल्या पिक नुकसानीची भरपाई मिळालेली नाही त्यांना ३१ मे पर्यंत मिळणार पिक विमा मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री यांनी विधानपरिषदेत दिली आहे.

मागील वर्षी म्हणजेच २०२२ च्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते.  प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप अंतर्गत विविध पिक विमा कंपन्यांकडून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये लवकरच पिक विमा जमा करण्याचे निर्देश कृषी मंत्री यांनी दिले आहेत.

महाराष्ट्र राज्यात प्रधान मंत्री पिक विमा योजना अंतर्गत खालील पिक विमा कंपन्या अधिकृत करण्यात आलेल्या आहेत.

पुढील माहिती पण वाचा ज्यांना पिक विमा मिळाला नाही त्यांना पुढील 15 दिवसात मिळणार पिक विमा

पिक विमा मिळण्याची तारीख फिक्स

भारतीय कृषि विमा कंपनी.

एचडीएफसी अर्गो.

आयसीआयसीआय लोंबार्ड.

युनायटेड इंडिया कंपनी.

बजाज अलियान्झ.

तर या पाच विमा कंपन्यांमार्फत महाराष्ट्र राज्यामध्ये प्रधान मंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री फसल बिमा योजना अंतर्गत शेतकरी बांधव आपल्या शेतातील पिकांचा पिक विमा काढून घेत असतात.

या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा.

पिकांचे नुकसान झाले कि पिक विमा कंपनीकडून नुकसानभरपाई म्हणून आर्थिक रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

परंतु यासाठी शेतकरी बांधवानी शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत शेतातील नुकसानग्रस्त पिकांची सूचना पिक विमा कंपनीस द्यावी लागते. त्यानंतर पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी नुकसानीची शहानिशा करतात.

लवकरच मिळणार उर्वरित पिक विमा

अनेक शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतातील पिकांची नुकसानीची सूचना देवून देखील पिक विमा कंपनी त्याची दखल घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक विम्यासाठीचे अर्ज विविध कारणे दाखवून फेटाळल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या १५ दिवसांत या विमा कंपन्यांनी या प्रकरणी फेटाळलेल्या अर्जांची पुन:तपासणी करुन कार्यवाही करण्यास संबंधित कंपन्यांना निर्देश कृषी मंत्री यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत.

पिक विमाच्या एकूण ६३,४०,००० लाभार्थ्यांना २ हजार ८२२ कोटी ३२ लाख रुपयांची नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली आहे. त्यापैकी २ हजार ३०५ कोटी रुपये ५४ लाख रुपयांची नुकसानभरपाई वाटप देखील करण्यात आली असून उर्वरित नुकसानभरपाई वाटप सुरु असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.

ज्या शेतकरी बांधवाना पिक विमा मिळालेला नाही त्यांना लवकरच म्हणजेच ३१ मे पर्यंत पिक विमा मिळणार असल्याची खात्रीशीर माहिती देण्यात आली आहे.

३१ मे पिक विमा मिळण्याची तारीख जाहीर करण्यात आल्याने लवकरच शेतकऱ्यांना लवकरच पिक विमा मिळेल अशी आशा करूयात.

अधिकृत माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *