राशन कार्ड रद्द होणार पहा सविस्तर माहिती

राशन कार्ड रद्द होणार पहा सविस्तर माहिती

जे नागरिक शासनाच्या निकषामध्ये बसणार नाहीत त्यांचे राशन कार्ड रद्द होणार आहे जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

शासनाच्या वतीने नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. यापैकीच एक योजना म्हणजे मोफत राशन होय. जे गरीब नागरिक आहेत किंवा जे नगरीक मोफत धान्य योजनेसाठी पात्र आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळावा हा या योजनेचा हेतू होता.

परंतु अनेक श्रीमंत नागरिक देखील मोफत धान्य योजनेचा लाभ घेत असल्याने शासनाचे अशा नागरिकांना आता धडा शिकविण्याचा चंग बांधलेला आहे.

मोफत धान्य योजनेचा पात्रतेच्या निकषात बसत नसतानाही बरेच नागरिक रेशन कार्ड वर मोफतच्या राशनचा लाभ घेत आहेत. त्यामुळे असंख्य पात्र आणि गरजू नागरिक या मोफत धान्य योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे शासनाचे अशा मोफत धान्य योजनेच्या पात्रतेच्या निकषात न बसणाऱ्या नागरिकांच्या विरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे.

पुढील योजना पण पहा शेतकरी उत्पादक कंपनी राशन दुकानामध्ये विकू शकेल भाजीपाला व फळे

राशन कार्ड रद्द होणार नवीन निकष खालील प्रमाणे आहेत

एखाद्या नागरिकाने स्वतःच्या कमाईच्या पैशातून जर १०० चौरस मीटरचा प्लॉट विकत घेतलेला असेल किंवा एखादा फ्लॅट विकत घेतलेला असेल किंवा मग दुकान चार चाकी गाडी ट्रॅक्टर असेल तर असे नागरिक या योजनेस अपात्र ठरणार आहेत.

एखाद्या नागरिकाच्या कुटुंबाची वार्षिक मिळकत 2 लाख किंवा शहरात कुटुंबाची वार्षिक मिळकत तीन लाख इतकी असेल तर असे नागरीका देखील या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.

जे नागरिक या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत त्यांनी स्वतः शासकीय कार्यालयात त्यांचे राशनकार्ड जमा करण्याचे आव्हान नागरिकांना आव्हान करण्यात आले आहे. हे राशन कार्ड जमा झाल्यानंतर ते रद्द करण्यात येणार आहेत्त.

राशन कार्ड ऑनलाइन चेक करा माहिती करून घ्या तुमचा १२ अंकी नंबर.

शासनाच्या वतीने जारी केलेल्या निकषांमध्ये बसत नसतील अशा नागरिकांनी किंवा परिवारांनी र्यांचे राशन कार्ड स्वतः सरकारकडे जमा करणे गरजेचे आहे.

शासनाकडून अशा राशनकार्डची पडताळणी केली जाणार आहे. पडताळणी केल्यावर जर असे नागरिक अपात्र ठरत असतील तर त्यांना दंड आकारला जाणार आहे.

स्वतः रेशन कार्ड रद्द केले नाहीत तर पडताळणी केल्यानंतर खाद्य विभाग कारवाई करून ती रद्द करणार आहे अशा लोकांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

कोणती कारवाई होऊ शकते

या नवीन नियमानुसार रेशन कार्ड जमा केले नाही तर तपासणीनंतर अशा व्यक्तींचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे त्या कुटुंबाविरोधात कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर अशा परिवारांनी आतापर्यंत घेतलेले सर्व रेशन त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे.

त्यामुळे तुम्ही देखील या निकषात बसत नसेल तर लगेच तुमचे कार्ड जमा करून द्या कारण अशा नागरिकांचे राशन कार्ड रद्द होणार आहेत. हि महत्वाची माहिती तुमच्या ग्रुपवर नक्की शेअर करा.

अधिक माहितीसाठी बातमी वाचा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *