प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना नवीन योजनेची घोषणा पहिल्या टप्प्यात १ लाख दुसऱ्या टप्प्यात २ लाख केवळ पाच टक्के व्याजाने मिळणार कर्ज

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना नवीन योजनेची घोषणा पहिल्या टप्प्यात १ लाख दुसऱ्या टप्प्यात २ लाख केवळ पाच टक्के व्याजाने मिळणार कर्ज

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी नवीन विश्वकर्मा योजना vishwakarma yojana या योजनेची घोषणा केली आहे जाणून घेवूयास्त या संदर्भातील सविस्तर माहिती. बेरोजगार तरुणांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण आता अशा बेरोजगार तरुणांना केंद्र शासनाकडून व्यवसाय वृध्दिंगत करण्यासाठी कर्ज मिळणार आहे.

अण्णासाहेब पाटील लोन योजना बँक ऑफ इंडिया देणार कर्ज

सध्या देशामध्ये लाखो छोटे व्यावसायिक आहेत. अशा व्यावसायिकांना त्यांचा उद्योग व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी विश्वकर्मा योजना आणली आहे.

विश्वकर्मा योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केली आहे. या योजनेला मंजुरी देखील देण्यात आली आहे. छोट्या व्यावसायिकांना योजनेद्वारे एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी केवळ ५ टक्के एवढा व्याजदर असणार आहे.

या योजना संदर्भातील खालील व्हिडीओ पहा.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत कोणाला होणार फायदा

जे तरूण चर्मकार आहेत, गवंडी, सोनार, शिंपी, सुतार, शिल्पकार, जाळी तयार करणारे, कुंभार, टेलर, लोहार यांना विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळणार आहे. केवळ यांनाच नव्हे तर या व्यतिरिक्त एकूण 18 पारंपरिक कामे करण्यासाठी हि विश्वकर्मा योजना आणण्यात आली आहे.

एकूण तीस लाख कुटुंबांना या विश्वकर्मा योजनेद्वारे थेट लाभ होणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. हि योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी बेसिक आणि ॲडव्हान्स अशा दोन प्रकारचे ट्रेनिंग लाभार्थींना दिले जाणार आहे.

त्यामुळे जे तरुण बेरोजगार आहेत अशा तरुणांसाठी हि नक्कीच आनंदाची बातमी आहे. सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणत वाढत चालले आहेत.

अशा परिस्थितीमध्ये हि विश्वकर्मा योजना अशा लाखो बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदतगार ठरू शकते.

या संदर्भात ट्वीटर माहिती देखील देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना लाभार्थी यादी खालीलप्रमाणे आहे

कारपेंटर

नाविक

लोहार

कुलुपांचे कारागीर

हातोडा आणि त्या संदर्भातील कीट बनविणारे कारागीर

सोनार

कुंभार,

लोहार,

मूर्तिकार,

मोची,

चटई झाडू बनविणारे कारागीर.

लहान मुलांची खेळणी बनविणारे कारागीर.

वारीक म्हजेच सलूनमध्ये काम करणारे कारागीर.

धोबी,

टेलर,

मच्छीमार

वरील यादीतील कारागिरांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याने अशा तरुणांना आपला व्यवसाय वाढविण्यास मदत मिळणार आहे आणि यासाठी शासनाकडून त्यांना अनुदान मिळणार आहे. त्यामुळे अधिकाधिक तरुणांनी या योजनेचा लाभ घेवून आपला व्यवसाय वृद्धींगत करावा.

कसा मिळेल योजनेचा लाभ

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीला शासनाकडून ट्रेनिंग दिले जाणार आहे. ट्रेनिंग म्हणजेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नवीन साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाकडून १५ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कारागिरांना पहिल्या टप्प्यामध्ये एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात दोन लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर देखील या योजना संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

तर अशा पद्धतीने या नवीन योजनेचे तपशील आहेत. या योजने संदर्भातील नवीन माहिती लवकरच आपल्यापर्यंत पोहचविली जाईल.

ई पिक पाहणी कशी करावी हे जाणून पुढील माहिती पहा. e peek pahani 2023 खरीप हंगाम ई पिक पाहणी नवीन व्हर्जनद्वारे अशी करा नोंदणी.

विश्वकर्मा योजनेतून किती कर्ज मिळणार?

पात्र लाभार्थींना पहिल्या टप्प्यात १ लाख तर दुसऱ्या टप्प्यामध्ये २ लाख कर्ज पात्र लाभार्थींना मिळणार आहे.

विश्वकर्मा योजनेसाठी कोणत्या व्यक्ती पात्र असतील?

या योजनेसंदर्भातील ज्या व्यक्ती पात्र आहेत त्याची यादी या लेखामध्ये दिलेली आहे. शिवाय योजनेसंदर्भातील व्हिडीओ देखील उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *