सातबारा जर आपण बघितला तर तो मराठीमध्ये असतो. आता यापुढे मात्र जमिनीचा सातबारा 24 भाषांमध्ये मिळणार आहे Land record in various languages. यासंदर्भात शासनाची तयारी देखील पूर्ण झाली आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
असा एकही शेतकरी मिळणार नाही ज्याला सातबारा काय असतो हे माहित नाही. केवळ शेतकरीच नव्हे तर शेतकऱ्याच्या घरातील सर्व सदस्यांनाच सातबारा संदर्भात माहिती असते. त्यामुळे सातबारा हा शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वाचा विषय आहे.
ज्यावेळी इंटरनेट नव्हते त्यावेळी तलाठी यांच्या मार्फत हस्तलिखित सातबारा मिळत असते. जसजसा काळ बदलत गेला तसतसे महसूल विभागात देखील खूप मोठे बदल झाले. आता तर संगणकीकृत डिजिटल सातबारा अगदी घरबसल्या मिळतो.
सातबारा 24 भाषांमध्ये मिळणार
असाच आणखी एक बदल महसूल विभागाकडून करण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे आता सातबारा 24 भाषांमध्ये मिळणार आहे.
शेतकरी बांधवांच्या जमिनीची पूर्ण माहिती देणारा सातबारा मराठी भाषेसह इतर भाषांमध्ये देखील उपलब्ध होणार आहे. सातबारा विविध भाषांमध्ये करण्याच्या अशा प्रकारचा पहिला प्रयोग महाराष्ट्र राज्यात राबविण्यात सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागात सध्या दोन कोटी ६२ लाख सातबारा उतारे आहेत. या सातबारे उताऱ्याचे सुमारे चार कोटी खातेदार आहेत. उपलब्ध सातबाऱ्यापैकी २ कोटी ५८ लाख सातबारा फेरफार नोंदी घेतल्या जातात.
डिजिटल सात बारा तुमच्या मोबाईलवरअसा डाउनलोड करा
खालील भाषांमध्ये बघा तुमचा सातबारा
महाभूमी अभिलेख या वेबसाईटवर सातबारा बघण्यासाठी जेंव्हा शेतकरी बांधव जात होतात त्यावेळी भाषेचा पर्यायच येत नव्हते म्हणजे default भाषा मराठी होती. आता नवीन पर्याय या ठिकाणी दिसत आहे. जसे हि तुम्ही या भाषा पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी खालील विविध भाषा तुम्हाला दिसतील.
मराठी.
इंग्लिश.
हिंदी.
बंगाली.
गुजराती.
पंजाबी.
मल्याळम.
तमिळ.
तेलगू.
कन्नडा.
ओरिया.
उर्दू.
असामी मनिपुरी.
नेपाली.
कोकणी.
मैथिली.
डोंगरी.
बोडो.
संतली.
सिंधी.
कश्मीरी देवनागरी.
कश्मीरी.
संस्कृत.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ बघा.
सातबारा भाषा बदलण्याचे काम महाराष्ट्रापासून सुरु
सातबारा भाषा बदलण्याची हि व्यवस्था महाराष्ट्रात राहत असलेल्या तामिळनाडू, मध्यप्रदेश, बिहार, पंजाब, गुजरात इत्यादी नागरिकांसाठी करण्यात आलेली आहे.
आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये त्या राज्याच्या भाषेतून सातबारा दिला जात होता. महाराष्ट्रात असे अनेक नागरिक आहेत जे राहतात महाराष्ट्रामध्ये परंतु त्यांनी जमिनी घेतलेल्या आहेत राज्याच्या बाहेर.
तर अशा नागरिकांना त्या भाषेतील सातबारा मिळण्याची आवश्यकता आहे. सातबारा भाषा बदलण्याचे काम जे आहे ते केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड ॲक्शन प्रोग्राम यानुसार केले जाणार आहे.
महाभूमी अभिलेख वेबसाईट लिंक
महाराष्ट्रामध्ये सातबारा २४ भाषांमध्ये भाषांतरित करण्याचे काम पूर्ण झाले आहे. बदललेला सातबारा डेमो कसा बघावा या संदर्भातील व्हिडीओ या लेखामध्ये दिलेला आहे.
सातबारा इतर भाषांमध्ये भाषांतरित केल्यामुळे महाराष्ट्रात राहणारे बाहेरील राज्यातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. शिवाय महराष्ट्रातील ज्या नागरिकांनी महराष्ट्राच्या बाहेर जमिनी घेतलेल्या आहेत त्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे.