अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन असा करा online अर्ज

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन असा करा online अर्ज

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2023 पहा संपूर्ण माहिती.

नोकरीमध्ये स्पर्धा वाढल्याने अनेक तरुण स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा करू इच्छित आहेत. परंतु व्यवसाय सुरु करायचा म्हटल्यास त्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. अशावेळी तुम्हाला जर आर्थिक सहाय्य मिळाले तर नक्कीच तुम्ही तुमचा छोटा मोठा व्यवसाय सुरु करू शकतात.

अण्णासाहेब पाटील योजना अंतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा या योजनेची मर्यादा वाढविण्यात आली असून पूर्वी ती १० लाख एवढी होती आता १० लाखाहून १५ लाख एवढी केली आहे.

annasaheb patil loan बिनव्याजी 1 लाखाचे कर्ज मिळणार

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२३ अंतर्गत मिळवा कर्ज

या योजनेच्या सहाय्याने अनेक तरुणांनी त्यांच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली असून होतकरू तरुणांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना अंतर्गत मराठा समाजातील तरुणांना व्यवसाय उभा करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ फक्त मराठा समाजातील तरुण किंवा तरुणींना दिला जातो. यासाठी ज्यांच्या दाखल्यावरती मराठा असा उल्लेख आहे तेच अर्जदार या योजेसाठी पात्र असतात.

पात्र लाभार्थी कोण? किती कर्ज मिळते, किती कालावधीसाठी मिळते ऑनलाईन अर्ज कासाफ करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2023 संदर्भात सविस्तर माहिती असणे गरजेचे

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेवून बेरोजगार तरुण विशेषतः ग्रामीण भागातील तरुण आपला व्यवसाय उभा करू शकतात.  तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजना हि योजना  खूपच उपयोगी असल्याचे सिद्ध झालेले आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन नुक्तेचे केले आहे. योजना तर असते परंतु त्याचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थींना होत नाही किंवा लाभ घेण्यास अडचण निर्माण होते. याचे प्रमुख कारण म्हणजे योजनेविषयी सविस्तर माहिती नसणे होय.

गरजू तरुणांकडून अण्णासाहेब पाटील कर्ज योजना मंजूर करण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. अशावेळी अर्जदारांनी अर्ज मंजुरीसाठी अनधिकृतपणे कोणालाही पैसे देवू नये या संदर्भात मंडळाच्या वतीने पत्र देखील काढण्यात आलेले आहे.

Annasaheb patil loan apply अण्णासाहेब पाटील योजनेचा निधी आला

ते पत्र खालील प्रमाणे आहे

या योजनेचा पूर्ण प्रक्रियेमध्ये LOI नूतनीकरण वगळता मंडळ कोणत्याही प्रक्रियेकरिता कोणतेही शुल्क आकारात नाही. योजना अंतर्गतच्या साहाय्याकरिता महामंडळाचे मुंबई मुख्यालय व जिल्हानिहाय जिल्हा समन्वयक यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे इतर कोणत्याही खाजगी व्यक्ती संस्थेच्या प्रभोलनाला बळी पडू नये असे आवाहन करण्यात आलेले आहे.

त्यामुळे तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही स्वतः या योजनेसाठी अर्ज करू शकता.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी कोणत्या व्यक्ती पात्र आहेत कोणती कागदपत्रे लागणार आहेत या संदर्भातील माहितीची एक pdf तयार केली असून खालील लिंकवर क्लिक करून हि pdf डाउनलोड करून घ्या.

असा करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात या वेबसाईटवर एक PPT देण्यात आली आहे यामध्ये ऑनलाईन अर्ज संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

 • https://udyog.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.
 • युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा. युजर आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी रोजगार नोंदणी करणे गरजेचे असते. ऑनलाईन रोजगार नोंदणी कशी करावी हे जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पहा
 • युजर आयडी आणि पासवर्ड टाकल्यावर तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर अशी माहिती दिसेल.
 • अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ऑनलाईन अर्ज करण्याआधी हि माहिती व्यवस्थित वाचून घ्या.
 • तुमचा जिल्हा निवडा.
 • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांच्या मर्यादेत आहे का अशी एक सूचना तुम्हाल दिसेल असेल तर होय या बटनावर क्लिक करा.
 • अर्जदाराने त्यांची वैयक्तिक माहिती टाकायची आहे. जसे कि अर्जदाराचे नाव, अर्जदाराचे आडनाव, जन्मदिनांक आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, इमेल, लिंग इत्यादी माहिती टाका आणि जतन करा या बटनावर क्लिक करा.

निवासी तपशील संदर्भातील माहिती भरा

 • त्यानंतर निवासी तपशील म्हणजेज अर्जदाराचा पत्ता या ठिकाणी व्यवस्थित टाईप करायचा आहे. अर्जदाराचे राष्ट्रीयत्व यामध्ये भारतीय निवडा, अधिवासी राज्यमध्ये महाराष्ट्र निवडा, अर्जदार दिव्यांग असेल तर येस हा पर्या निवडा किंवा नो हा पर्याय निवडा.
 • अर्जदाराकडे PAN CARD आहे का असेल तर तसा पर्याय निवडा आणि PAN CARD क्रमांक टाका.
 • अर्जदाराचा कायमचा व व्यवहाराचा पत्ता टाकायचा आहे.
 • अर्जदाराची शैक्षणिक अहर्ता निवडा आणि अर्ज जतन करा या बटनावर क्लिक करा.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत कर्ज तपशील भरा

 • जो व्यवसाय अर्जदार करत असेल त्या व्यवसायाचे नाव दिलेल्या चौकटीत टाका.
 • अर्जदाराला त्या व्यवसायातून किती उत्पन्न मिळते या संदर्भातील माहिती दिलेल्या चौकटीमध्ये टाका.
 • ज्या ठिकाणी अर्जदार व्यवसाय करत आहे त्या ठिकाणचा पत्ता टाका.
 • अर्जदाराला बँकेकडून किती रक्कम कर्ज स्वरुपात हवी आहे या संदर्भातील सविस्तर माहिती टाका व अर्ज जतन करा.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2023 अंतर्गत ऑनलाईन अर्ज करतांना काही कागदपत्रे अपलोड करावी लागतात ती कागदपत्रे अशी आहे.

 • पुढील आणि मागील बाजू दिसणारे आधार कार्ड अपलोड करणे गरजेचे आहे. फाईल साईज १० एमबीच्या आत असणे गरजेचे असून format JPG PNG किंवा PDF असणे गरजेचे आहे.
 • उत्पन्नाचा दाखला जर दाखला नसेल तर अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्यांचा ITR देखील अपलोड करता येतो.
 • इतर काही कागदपत्रे असतील तर अर्जदार ती देखील अपलोड करू शकतात.

सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट या हिरव्या रंगाच्या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा. अर्ज सबमिट केल्यावर एक शपथपत्र स्क्रीनवर दिसेल ते वाचून घ्या आणि i agree या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक मिळेल त्याच प्रमाणे LOI पात्रता प्रमाणपत्र देखील मिळणार आहे.

योजनेची स्थिती तपासा

तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे अर्ज मंजूर आहे कि न मंजूर झाला आहे हे माहिती करून घेण्यासाठी महास्वयं या वेबसाईटला भेट द्या. युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लोगीन करा. त्यानंतर अशा प्रकारचा dashboard तुम्हाला दिसेल.

 • अर्ज क्रमांक.
 • ज्या दिवशी अर्ज केला ती तारीख.
 • योजनेचे नाव.
 • योजनेची स्थिती.
 • LOI
 • अपलोड बँक स्वीकृतीपत्र.

इत्यादी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल ती सविस्तर वाचून घ्या. अशा प्रकारे आपण या ठिकाणी जाणून घेतले आहे कि अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो, यासाठी कोणते कागदपत्रे लागतात, कोणत्या व्यक्ती पात्र आहेत व किती कर्ज मिळते.

रोजगार नोंदणी व्हिडीओ

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज कोठे आणि कसा करावा?

महास्वयं या वेबसाईवर हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागतो.

अर्ज कोण करू शकतो?

ज्याच्या जातीच्या दाखल्यावर मराठा असा उल्लेख असेल अशा व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागतात?

अर्जदाराचे आधार व उत्पन्नाचा दाखला हि मुख्य कागदपत्रे ऑनलाईन अर्ज सादर करतांना अपलोड करावी लागतात.

या योजनेमुळे कोणता लाभ होतो?

अर्जदाराने घेतलेल्या कर्जाचे व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळ यांच्याकडून भरले जाते हा योजनेचा मुख्य लाभ आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची अशी तारीख नसते. अर्ज कधीही करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *