आयुष्यमान कार्ड नसेल तर मिळणार नाही राशन ayushyaman bharat card download

आयुष्यमान कार्ड नसेल तर मिळणार नाही राशन ayushyaman bharat card download

आयुष्यमान कार्ड नसेल तर मिळणार नाही राशन वाचा सविस्तर

तुम्हाला जर स्वस्त धान्य नियमित हवे असेल तर आता भारत आयुष्यमान कार्ड काढणे महत्वाचे ठरणार आहे. आयुष्यमान काढले कार्ड काढले नाही तर भविष्यात अशा नागरिकांना स्वस्त धान्यला मुकावे लागण्याची शक्यता आहे.

आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी सध्या शासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे आता लगेच तुमचे आयुष्यमान कार्ड डाउनलोड करून घ्या.

एकदा का तुम्हाला स्वस्त धान्य मिळणे बंद झाले तर इतर सुविधा देखील मिळणे अवघड होण्याची शक्यता नाकारता येते नाहीत.

या योजने अंतर्गत नागरिकांना वैदकीय उपचारासाठी पाच लाख रुपयांपर्यंत शासनाकडून आर्थिक सहाय्य पुरविले जाते. गंभीर आजार झाला असेल तर उपचारासाठीचा खर्च भागविता येत नाही.

Ayushman card ekyc ईवायसी करा तरच मिळेल 5 लाख रुपयांपर्यंत लाभ अशी करा ekyc केवळ 4 मिनिटांत

५ लाखापर्यंत मिळते मदत

अशावेळी तुमच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड असेल तर तुम्हाला उपचारासाठी शासनाकडून ५ लाख रुपयांचे अर्धिक सहाय्य मिळू शकते ज्यामुळे दवाखान्यात कमी खर्च येतो.

भविष्यामध्ये ज्या नागरिकांकडे आयुष्यमान कार्ड नसेल अशा नागरिकांना आता स्वस्त धान्य दुकानामध्ये देखील धान्य न मिळण्याची शक्यता आहे.

बातमी लिंक

त्यामुळे तुम्ही अजूनही तुमचे आयुष्यमान कार्ड काढले नसेल तर लगेच काढून घ्या जेणे करून तुम्हाला तुमचे नियमित मिळणारे राशन मिळत राहील.

केंद्र सरकारने आयुष्यमान कार्ड योजना सुरू केली आहे त्याच धर्तीवर सध्या राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू आहे या दोन्ही योजनेचे एकत्रित असे आयुष्यमान गोल्डन कार्ड बनवणे सुरू आहे.

मोबाईलवर देखील काढता येईल आयुष्यमान कार्ड

गोल्डन कार्डच्या माध्यमातून सरकारी किंवा खाजगी रुग्णालयामध्ये पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत दिले जातात.

आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी आरोग्य विभागाकडून नोंदणी करण्यात येत आहे सरकारी रुग्णालयामध्ये किंवा कुठल्याही ऑनलाईन सेंटरवर हे आयुष्यमान कार्ड काढता येईल. शिवाय अगदी तुमच्या मोबाईलवर देखील हे कार्ड काढता येते.

मोबाईलवर आयुष्यमान कार्ड कसे डाउनलोड करता येते या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा

वरील व्हिडीओ बघून तुम्ही तुमचे आयुष्यमान कार्ड काढू शकता. एवढेच नव्हे तर तुमच्या घरातील सर्व सदस्यांचे देखील तुम्ही अशाच पद्धतीने कार्ड काढू शकता.

तर लगेच तुमचे आयुष्यमान कार्ड कार्ड डाउनलोड करून घ्या आणि शासकीय योजनाचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *