e vehicle for handicap असे तपासा तुमच्या अर्जाचे ऑनलाईन स्टेट्स नवीन अर्ज या दिवशी होणार सुरु

e vehicle for handicap असे तपासा तुमच्या अर्जाचे ऑनलाईन स्टेट्स नवीन अर्ज या दिवशी होणार सुरु

e vehicle for handicap

दिव्यांग व्यक्तींनी शासकीय अनुदानावर मिळणारे व्यावसायिक वाहनासाठी ऑनलाईन अर्ज केले होते त्या संदर्भात त्या अर्जाची सद्यस्थिती कशी बघावी या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत.

ज्या दिव्यांग व्यक्तींनी पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकानासाठी अर्ज केला होता e vehicle for handicap त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आता संपली आहे.

व्यवसाय करण्यासाठी वाहनावर अनुदान मिळविण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२४ हि होती. हि तारीख आता संपलेली आहे.

annasaheb patil loan बिनव्याजी 1 लाखाचे कर्ज मिळणार

e vehicle for handicap online application status

ज्यांना हा अर्ज करायचा होता परंतु अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती होती हे माहित नसल्याने किंवा इतर कारणाने तुम्ही जर या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर येणाऱ्या एप्रिल महिन्यापासून e vehicle for handicap हे अर्ज पुन्हा सुरु होणार आहेत. त्यावेळी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेवू शकता.

तुम्ही जर ऑनलाईन अर्ज केला असेल आणि तुम्हाला तुमचे स्टेट्स काय आहे हे जाणून घ्यायचे असेल तर या व्हिडीओमधील पद्धतीचा अवलंब करा जेणे करून तुम्हाला हि प्रोसेस कळेल आणि तुमची या योजनेसाठी निवड झाली आहे का या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला कळू शकेल.

खालील व्हिडीओ पहा.

कशी आहे योजना e vehicle scheme

दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकानासाठी अर्ज करता येतो. यासाठी अपंग व्यक्तींना https://evehicleform.mshfdc.co.in/ या संकेत स्थळावर अर्ज करणे गरजेचे असते.

दिलेल्या विहित दिनांकाच्या आत ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. अर्ज व्यवस्थित सादर केल्यानंतर अर्जदारांना त्यांनी अर्ज करतेवेळी जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईलवर व इमेलआयडीवर एक रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच नोंदणी क्रमांक पाठविण्यात येतो. हा रजिस्ट्रेशन नंबर अर्जदारांनी व्यवस्थित सांभाळून ठेवणे आवश्यक आहे कारण

अर्ज सादर केल्यावर अर्जदाराला त्याने केलेल्या अर्जाची सद्यस्थिती पाहता येते.

अशी पहा अर्जाची सद्यस्थिती e vehicle for handicap

  • गुगलच्या सर्चबारमध्ये https://evehicleform.mshfdc.co.in/ हा वेबॲड्रेस तुमच्या ब्राउजरच्या युआरएलच्या सर्च बारमध्ये टाका आणि सर्च करा.
  • जसे हि तुम्ही हा वेबॲड्रेस सर्च कराल तर महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाची वेबसाईट ओपन होईल.
  • या ठिकाणी तुम्ही बघू शकता कि पर्यावरण पूरक इ वाहने इ cartवर विविध व्यवसायाद्वारे दिव्यांग जणांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हि योजना आखण्यात आलेली आहे.
  • Tract Applicant Application या पर्यायावर क्लिक करा.
  • ज्यावेळी तुम्ही अर्ज केला होता त्या वेळी तुमच्या मोबाईल नंबरवर किंवा इमेलआयडीवर एक रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे तो बघा किंवा तुमच्या अर्जावर देखील हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला दिसेल.
  • रजिस्ट्रेशन नंबर दिलेल्या चौकटीमध्ये टाकून मोबाईल नंबर टाका आणि Track या बटनावर क्लिक करा.

अशी तपासा माहिती

तुमच्या अर्जासंदार्भातील सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल. जसे कि अर्जाचा रजिस्ट्रेशन नंबर, application date, current status, current comments, first name, last name, Gender, cast, Date of birth, Blood group, guardian name, mobile number, marital status  हि माहिती वाचून घ्या.

अधिकृत वेबसाईट लिंक

या ठिकाणी current status या रकान्याखाली pending असे लाल रंगामध्ये दाखवत आहे याचा अर्थ हा अर्ज अजून मंजूर झालेला नाही.

तुम्हाला जर तुमचा अर्ज pdf मध्ये डाउनलोड करायचा असेल तर Generate pdf या बटनावर क्लिक करून अर्ज डाउनलोड करून घ्या.

तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जाणून घेतले आहे कि दिव्यांग व्यक्तींनी पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकानासाठी अर्ज केला असेल तर त्याचे स्टेट्स कसे बघावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *