शबरी घरकुल योजना नवीन जी आर. अर्जामध्ये कोणती माहिती सादर करायची आहे या संदर्भातील एक व्हिडीओ या लेखाच्या सर्वात शेवटी देण्यात आलेला आहे तो व्हिडीओ पाहून तुम्ही अर्ज कासाफ करावा लागतो या संदर्भात अधिक माहिती जाणून घेवू शकता.
ज्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना राहण्यासाठी स्वतःचे घर नाही किंवा कुडा मातीचे घर किंवा पत्र्याचे घर किंवा झोपडीमध्ये राहतात अशा नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने शबरी आदिवासी घरकुल योजना आणली आहे.
या योजना अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांना शासकीय अनुदानावर घरकुल मिळणार आहे.
शासनाची शबरी आदिवासी घरकुल योजना शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील नागरिकांसाठी होती. परंतु हि योजना शहरी भागामध्ये प्रभावीपणे राबविली गेली नाही.
सदर शासन निर्णयानुसार शबरी आदिवासी घरकुल योजना ही ग्रामीण व शहरी या दोन्ही भागात राबविणे अपेक्षित होते ग्रामीण
शहरी भागामध्ये शबरी घरकुल योजनेची अंमलबजावणी यापुढे नगर विकास विभागाकडून करण्यात येणार आहे.
Gharkul list 2022 घरकुल यादी आली या जिल्ह्याची
लाभार्थी पात्रता शबरी घरकुल योजना नवीन
- अर्जदार अनुसूचित जमातीचा असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराच्या स्वतःच्या मालकीचे पक्के घर नसावे.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील १५ वर्षापासून वास्तव्य करत असावा.
- घराचे बांधकाम करण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःची जागा असावी नसेल तर शासनाने दिलेली जमीन असावी.
- अर्जदाराने याआधी कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- अर्जदाराचे वय अर्ज करतेवेळी १८ वर्षे पूर्ण असावे.
- अर्जदाराचे स्वतःच्या नावे बँक खाते असावे.
शबरी घरकुल योजना अंतर्गत 219 चौरस फूट चटई क्षेत्र बांधकामास अनुदान दिले जाणार आहे. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ३ लाखापेक्षा जास्त नसावे.
शबरी घरकुल योजना अनुदान मिळण्याची पद्धत
शबरी घरकुल योजना अंतर्गत लाभार्थ्यांना घर बांधकाम करण्यासाठी जी अनुदान रक्कम मिळणार आहे ती 2.50 लक्ष एवढी राहणार आहे. २.५० लाख रुपये अनुदान पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा केले जाणार आहेत ते असे आहे.
घरकुल मंजुरी मिळाल्यानंतर लगेच पहिला टप्पा हा ४०,००० रुपयांचा असणार आहे.
दुसरा टप्यात निधी मिळविण्यासाठी घराचे बांधकाम प्लिंथ लेव्हल पर्यंत असणे गरजेचे आहे, तरच दुसऱ्या टप्प्यातील 80,000 रुपये मिळणार आहेत.
तिसऱ्या टप्प्यासाठी घराचे बांधकाम लिंटल लेवल पर्यंत असणे गरजेचे आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील लाभार्थीला 80,000 हजार रुपये मिळणार आहे.
आणि सर्वात शेवटी घरकाम बांधकाम पूर्ण झाल्यावर 50000 हजार रुपये लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.
अशा पद्धतीने वरील ४ टप्प्यामध्ये २.५० एवढी रक्कम शबरी घरकुल योजना अंतर्गत लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये अनुदान म्हणून जमा केली जाणार आहे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी प्रमाणपत्र
- अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र
- घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी पुरावा
- उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांचा
- शिधापत्रिका
- आधार कार्ड
- एक रद्द केलेल्या धनादेश अथवा बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत फोटो व खाते क्रमांक असलेले
अर्ज करण्याची पद्धत
या शासन निर्णयासोबत अर्ज देखील देण्यात आलेला आहे. शबरी घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने हा अर्ज प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे व्यक्तीशः टपालाने किंवा ईमेलद्वारे सादर करणे गरजचे आहे.
योजनेसाठी प्रधान्य
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा
जातीय दंगल झाली असेल आणि त्यामध्ये एखाद्या वाय्क्तीच्या घराचे नुकसान झाले असेल तर अशा व्यक्तींना या योजनेसाठी प्राध्यान्य देण्यात येणार आहे.
ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार पिडीत व्यक्ती या योजनेचा लाभ दिला जातो.
त्याचप्रमाणे विधवा किंवा परितक्या महिलाना या योजनेचा लाभ दिला जातो.
आदीम जमातीची व्यक्तीना देखील या योजनेचा प्राधान्याने लाभ दिला जातो.
शबरी आदिवासी घरकुल योजना अंतर्गत ५ टक्के आरक्षण हे दिव्यांग व्यक्तीसाठी ठेवण्यात आलेली आहे यामध्ये दिव्यांग महिलांना प्रधान्य देण्यात येणार आहे.
शबरी घरकुल योजना बांधकाम यंत्रणा
शबरी घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी स्वतः घराचे बांधकाम करू शकतो. मात्र नगरपरिषद महानगरपालिका क्षेत्रासाठी लाभार्थी स्वतः बांधकाम करू शकत नसेल तर महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत त्यांच्याकडील बांधकाम यंत्रणा मार्फत घरकुलाचे बांधकाम करण्यात येते.
अर्जदाराकडे घरबांधकाम करण्यासाठी जागा नसेल तर अशावेळी खाजगी घर बांधकाम विकासक यांच्याकडून बांधण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पांमध्ये पात्र लाभार्थ्यांना सदर योजनेमधून अनुदान दिले जाणार आहे.
अर्जाचा नमुना डाउनलोड करा
अर्जाचा नमुना खाली दिलेला आहे. या अर्जावर अर्जदाराला स्वतःचा फोटो चिटकवावा लागणार आहे. त्यानंतर प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प. ज्याही जिल्ह्यात हे कार्यालय असेल त्या ठिकाणी अर्जदाराला हा अर्ज सादर करावा लागणार आहे.
या अर्जामध्ये जी माहिती विचारलेली आहे ती माहिती योग्य पद्धतीने भरा.
अर्जदाराचे नाव.
संपूर्ण पत्ता.
आधार क्रमांक.
शिधापत्रिका क्रमांक.
बँक खाते तपशील बँकेचे नाव व खाते क्रमांक.
जन्म दिनांक.
वय.
जमात.
लिंग.
विवाहित किंवा अविवाहित विवाहित असल्यास आपत्य संख्या.
कुटुंबातील व्यक्तींची संख्या.
योजनेचे नाव मागणी.
अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न.
उत्पन्नाची साधने.
स्वतःच्या मालकीची जागा आहे काय.
असल्यास होय नसल्यास नाही
हि व इतर माहिती अर्जदारास अर्जामध्ये भरावयाची आहे आणि सदरील अर्ज हा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या कार्यालयात सादर करावा.
शबरी घरकुल योजना निधी आला pdf मध्ये अर्ज डाउनलोड करा.
अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना या शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने हा अर्ज प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे अर्ज करावा लागतो.
शबरी घरकुल योजना शहरी वर्ष २०२४ साठी एकज pdf अर्जाचा नमुना शासनाच्या जी आरमध्ये देण्यात आलेला आहे. तो अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासठी सुविधा या लेखामध्ये देण्यात आलेली आहे. या ठिकाणांहून तुम्ही हा अर्ज डाउनलोड करू शकता.
शबरी घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड पासपोर्ट सैज्ज फोटो, रहिवासी प्रमाणपत्र अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला शिधा पत्रिकेची प्रत आणि एक रद्द केलेला चेक अशी कागदपत्रे लागतात.