महाराष्ट्राला वादळी पावसाचा दणका वाचा सविस्तर माहिती.
सध्या शेतीतील कामांना खूप वेग आला आहे. लवकरच मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार असल्याने पेरणीची घाई शेतकरी बांधवाना लागलेली आहे.
पुढील ४ ते ५ दिवसात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारा जोरात वाहणार असून विजांचा कडकडाट देखील होणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे.
अतिवृष्टी भरपाईसाठी 3600 कोटी रुपयांची तरतूद
त्यामुळे शेतकरी बांधवानी आपापली गुरे ढोरे सुरक्षित ठिकाणी राहील याची काळजी घ्यावी व स्वतः देखील सुरक्षित राहावे.
मराठवाडातील बीड, नांदेड, लातूर, धाराशिव व इतर जिल्ह्यांमध्ये देखील हा वादळी वारांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने शेतकरी बांधवानी काळजी घ्यावी.
या वादळी वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर एवढा राहण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे सोबत पावसाच्या हलक्या सरी पडणार असल्याने आता होत असलेला उकाडा थोडाफार कमी होण्याची शक्यता आहे.
नैसर्गिक संकटामुळे जीवितहानी झाल्यास शासनाकडून मिळते सहाय्य
संकटांमुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचे अतोनात नुकसान होते त्यामुळे हवामान अंदाज कसा आहे हे शेतकरी बांधवानी जाणून घेणे गरजेचे आहे.
नैसर्गिक संकटांवर मात करता येत नसली तरी त्यावर उपाय योजना करून त्यापासून वाचता येवू शकते. त्यामुळेच शेतकरी बांधवानी हवामान अंदाज घेणे नेहमी फायद्याचे ठरणार आहे.
सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा
नैसर्गिक अप्पातीमुळे शेतकऱ्यांचे काही नुकसान झालेच तर शासन त्यांना अनुदान देते उदारणार्थ वीज पडणे, सर्पदंश होऊन मृत्यू होणे, विजेचा शॉक लागणे इत्यादी अप्पातीमुळे शेतकरी बांधव दगावला तर गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने आर्थिक सहाय्य दिले जाते.
शासनाच्या अशा योजनांची माहिती देखील शेतकरी बांधवाना असणे गरजेचे आहे कारण वादळी वारा किंवा विजांच्या कडकडाटांमुळे मृत्यू ओढवला तर शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळू शकते.
या वर्षी जोरदार पडणार पाऊस
या वर्षी मान्सूनचा प्रवास अगदी ठरल्याप्रमाणे होत असल्याने त्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण न झाल्याने लवकरच पेरणी होईल अशी अशा निर्माण झाली आहे.
रेमल या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरावरील मान्सून सक्रीय झाला आहे. मान्सूनने यावर्षी जवळपास अकरा दिवस अगोदरच पूर्वोत्तर राज्यांसह सिक्कीम आणि पश्चिम बंगालपर्यंत मजल मारली आहे.
विदर्भ मराठवाडा आणि कोकणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे. मान्सून लवकर येणार असल्याची हि बातमी शेतकरी बांधवांसाठी खूप आनंददायी ठरणार आहे. महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाउस झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडलेले होते.
यावर्षी मात्र पाऊस चांगला होणार असल्याने शेतकऱ्यांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.