जाणून घेवूयात गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात अनुदान योजना gopinath mundhe shetkari anudan yojana संदर्भात सविस्तर माहिती.
शेती व्यवसाय करतांना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. वीज पडणे, सर्प दंश, विंचू चावणे विजेचा शॉक बसने इत्यादी संकटांमुळे शेतकऱ्यांना दगा फटका होऊ शकतो.
याच बाबीचा विचार करून शासन गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवीत आलेले आहे. शेतकऱ्याचा रस्ता अपघात झाला तरी या योजना अंतर्गत अनुदान दिले जाते.
शेतकऱ्याचा अपघात झाला तर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, अशावेळी या योजनेचा लाभ घेतला तर शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळते.
गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात योजनेचा कुटुंबातील 2 सदस्यांना लाभ
गोपीनाथ मुंढे शेतकरी विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांच्या घरातील विहिती खातेदार म्हणून नोंद नसलेल्या इतर दोन सदस्यांना या योजनेचा लाभ देखील दिला जातो. यामध्ये शेतकऱ्याची आई, वडील, शेतकऱ्याची पत्नी शेतकरी स्त्री असेल तर तिचा पती, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी दोघांना या योजनेचा लाभ दिला जातो.
असा मिळतो लाभ.
शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला तर २ लाख रुपये अनुदान दिले जाते. अपघातामध्ये दोन डोळे किंवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय जर निकामी झाला तर २ लाख रुपये अनुदान दिले जाते.
अपघातामध्ये एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाला तर १ लाख रुपये एवढे अनुदान मिळते.
एकदा या योजनेचा लाभ घेतला तर परत लाभ दिला जात नाही.
विहीर बांधकाम करण्यासाठी मिळते अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज
योजनेसाठी लाभार्थी पात्रता
शेतकऱ्याचे वय १० ते ७५ वर्षे एवढे असणे आवश्यक आहे.
अपघातामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर अनुदानाचा लाभ पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी, आई, वडील किंवा सून यांना दिला जातो.
खालील कारणांमुळे मृत्यू झाल्यास मिळतो लाभ.
रस्ता किंवा रेल्वे अपघात.
पाण्यात बुडून मृत्यू.
जंतू नाशके हाताळतांना विषबाधा होणे.
विजेचा शॉक लागणे.
वीज पडून मृत्यू.
उंचावरून पडून झालेला अपघात.
सर्पदंश किंवा विंचू दंश.
जनावर चावून झालेला मृत्यू.
बाळंतपणातील मृत्यू.
इत्यादी कारणांमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यू झाला तर त्यांना शासनाकडून मिळते.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागणार आहे. या प्रस्तावासोबत काही कागदपत्रे सादर करावे लागणार आहे ते खालीलप्रमाणे gopinath mundhe shetkari anudan yojana.
सातबारा उतारा.
मृत्यूचा दाखला.
शेतकऱ्यांचे वारस असल्याचे प्रमाणपत्र.
वारसाचे ओळखपत्र जसे कि आधार कार्ड, पॅन, बँक पासबुक, निवडणूक ओळखपत्र.
अपघातग्रास्ताचा वयाचा दाखला.
प्रथम माहिती अहवाल किंवा घटनास्थळाचा पंचनामा.
पोस्ट मोर्टेम अहवाल.
इत्यादी कागदपत्रे प्रस्तावासोबत जोडावे लागणार आहे. प्रस्तावाचा नमुना देखील आपण या ठिकाणी देणार आहोत.
अर्जाचा नमुना डाउनलोड करा
सर्व कागदपत्रे व प्रस्ताव शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीने ३० दिवसाच्या आत कृषी अधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.
गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून अर्जाचा नमुना डाउनलोड करून घ्या.
या प्रास्तव तुम्ही डाउनलोड देखील करू शकता. या व्हिडीओच्या दिस्क्रीप्षण बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्या.
गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात अनुदान संदर्भातील शासनाचे परिपत्रक पहा