नॅनो युरियासाठी ऑनलाईन अर्ज सुरु शासनाकडून मिळणार अनुदान nano urea online application for subsidy Maharashtra

नॅनो युरियासाठी ऑनलाईन अर्ज सुरु शासनाकडून मिळणार अनुदान nano urea online application for subsidy Maharashtra

नॅनो युरियासाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले असून लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले जाणून घेवूयात संपूर्ण माहिती nano urea.

महाराष्ट्र शासनाकडून नॅनो युरिया व नॅनो युरिया DAP इत्यादी खते अनुदानावर मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करा असे आवाहन करण्यात आले आहे.

सगळ्यात आधी नॅनो संकल्पना जाणून घेवूयात. नॅनो म्हणजे बारीक,सूक्ष्म,आकाराने लहान जसे आपण एकत आलेलो आहे कि नॅनो कार, नॅनो सीम, नॅनो laptop त्याच पद्धतीने हा नॅनो युरिया किंवा नॅनो डीएपी.

ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील व्हिडीओ या लेखाच्या सर्वात शेवटी देण्यात आला आहे तो पाहून त्याप्रमाणे अर्ज करून घ्या.

विहीर बांधकाम करण्यासाठी मिळते अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज

नॅनो युरियासाठी ऑनलाईन अर्ज प्रोसेस जाणून घेण्याआधी महत्वाची माहिती माहिती

युरिया किंवा डीएपी खते ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे त्यामुळे ३० जून २०२४ पर्यंत महाडीबीटी या वेबपोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

नॅनो युरिया किंवा डीएपी खते ५० टक्के अनुदानावर मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो हि संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत.

परंतु त्याआधी जाणून घेवूयात कसा आहे हा नॅनो युरिया आणि का शासन यासाठी अनुदान देत आहे, थोडीशी शिल्लक माहिती आहे पण तुमच्या अत्यंत कामाची आहे.

हरितक्रांतीमुळे रासायनिक खतांचा वापर वाढला

नॉर्मन बोरलॉग हा जरी जागतिक हरित क्रांतीचा जनक असला तरी भारतामध्ये एमएस स्वामिनाथन हे हेच हरितक्रांतीचे जनक आहेत. अन्नधान्य मोठ्या प्रमाणात घेता यावे यासाठी भारतामध्ये १९६८ मध्ये हरित क्रांती झाली.

पिकांना रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे उत्पादन निघण्यास सुरुवात झाली. त्यावेळी जरी रासायनिक खतांचा शेतीला फायदा झाला असला तरी आता मात्र त्याचे खूप मोठे परिणाम सोसावे लागत आहे.

सध्या शेतकरी पिकांचे उत्पादन जास्त यावे यासाठी शेतामध्ये युरिया मोठ्या प्रमाणत वापरतात. हा nano urea युरिया सोलिड फॉर्ममध्ये उपलब्ध असल्याने ७० टक्के युरिया वाया जातो एक तर तो पाण्यामध्ये वाहून जातो किंवा हवेद्वारे उडून जातो.

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु.

युरियाच्या वापराने जमिनीची उत्पादनक्षमता कमी होत आहे. रासायनिक खतांचे अनेक दुष्परिणाम जरी दिसत असेल तरी शेतकरी त्याचा वापर करत आहेच.

याला पर्याय म्हणून नॅनो युरिया हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. पारंपारिक युरीयामुळे पिकांना फारतर ३० ते ४० टक्के नत्र मिळते मात्र नॅनो युरियामुळे पिकांना ८० टक्के नत्र मिळते.

नॅनो युरियामुळे उत्पादनात होते वाढ

नॅनो युरियाची फवारणी करावी लागत असल्याने हा युरिया पिकांच्या पानावर फवारला जातो. पिकांच्या पर्णरंघ्रतून हा युरिया लगेच शोषला जातो त्यामुळे वनस्पतीस हवा तेवढा युरिया मिळतो.

या उलट पारंपारिक युरिया जो सोलिड फॉर्म मध्ये असतो तो जमिनीवर फेकावा लगतो. एकतर तो हवेत उडून जातो किंवा जास्त पाउस झाला तर वाहून जातो किंवा जमिनीत मुरून जातो. परंतु नॅनो युरियाची फवारणी केल्यामुळे पिकांना जवळपास ८० टक्के नत्र उपलब्ध होते. शिवाय यापासून जमिनीची किंवा पर्यावरणाची हानी होत नाही.

पीएम विश्वकर्मा योजनेचा अर्ज मंजूर झाला का असे तपासा pm vishwkarma scheme status check online

अर्ध्या लिटरच्या बाटलीमध्ये (५०० एमएल) ४० हजार मिलीग्राम लिक्विड नायट्रोजन असते जे आपण दुकानातून खरेदी केलेल्या ५० किलो युरियाच्या bag एवढे परिणाम कारक असते. त्यामुळे नॅनो युरिया वापरणे कधीही चांगले.

यामुळेच शासन शेतकऱ्यांना नॅनो युरिया खरेदी करण्यासाठी ५० टक्के अनुदान देत आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२४ आहे. नॅनो युरियासाठी ऑनलाईन अर्ज करून खतांसाठी शासकीय अनुदान मिळवा.

नॅनो युरियासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया nano urea online application

युरिया अनुदान मिळविण्यासाठी अर्ज कसा करावा लागतो.

नॅनो युरिया अनुदान मिळविण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत एकदम सोपी आहे.

गुगलच्या सर्चबारमध्ये mahadbt farmer login असा शब्द टाकून सर्च करा.

सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

महाडीबीटी वेबसाईटची लिंक येईल त्यावर क्लिक करा.

या ठिकणी तुम्हाला लॉगीन करायचे आहे. लॉगीन करण्यासाठी दोन पद्धती दिल्या आहेत एकतर तुम्ही वापरकर्ता आयडी किंवा आधार नंबरवर आलेल्या otp द्वारे लॉगीन करू शकता.

लॉग इन झाल्यावर अर्ज करण्याची पद्धत

लॉग इन झाल्यावर अर्ज करा या लिंकवर क्लिक करा.

बियाणे औषधे व खते या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या बटनावर क्लिक करा.

तुमच्या स्क्रीनवर एक फॉर्म ओपन होईल त्यामध्ये अचूक माहिती भरायची आहे जसे कि मुख्य घटक या पर्यायामध्ये अनुदानावर बियाणे औषधे व खतांचे वाटप हा पर्याय निवडा.

बाब निवडा या पर्यायामध्ये खते हा पर्याय निवडा.

तुम्ही ज्या पिकांची नोंदणी केली असेल ते पिक निवडा.

अनुदान हवे असलेली बाब या पर्यायामध्ये दोन पर्याय तुम्हाला दिसेल १. नॅनो युरिया २.नॅनो डीए.पी दोनी पैकी एक कोणताही पर्याय तुम्ही निवडू शकता. या ठिकाणी आपण नॅनो युरिया हा पर्याय निवडणार आहोत.

नॅनो युरियासाठी ऑनलाईन अर्ज नॅनो क्षेत्र निवडा

जमिनीचे क्षेत्र तुम्हाला निवडायचे आहे. किती एकरसाठी तुम्हाला हा नॅनो युरिया लागणार आहे. उदाहरणार्थ आपण ४० गुंठे म्हणजे १ एकर एवढे क्षेत्र निवडल्यास क्षेत्रानुसार आकडा या ठिकाणी आपोआप येणार आहे.

म्हणजेच एक एकरसाठी 2 बॉटल मिळणार आहेत.

सर्व माहिती बरोबर भरल्यानंतर जतन करा या पर्यायावर क्लिक करा.

या अर्जाव्यतिरिक्त अजून अर्ज करायचा असेल तर yes या पर्यायावर क्लिक करा किंवा no हा पर्याय निवडा. आपण no या पर्यायावर क्लिक करणार आहोत.

नॅनो युरियासाठी ऑनलाईन अर्ज संदर्भातील खालील बातमी पहा.

नॅनो युरिया अर्ज सादर करण्याची पद्धत. nano urea online application submission process.

स्क्रीनच्या डाव्या बाजूला (तुमच्या उजव्या हाताला) दिसत असलेल्या अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.

पहा या बटनावर क्लिक करा.

एकापेक्षा जास्त योजनांसाठी तुम्ही अर्ज केला असेल तर कोणत्या योजेचा आधी तुम्हाला गरज आहे त्या संदर्भात प्राधान्य क्रमांक निवडा.

दिलेल्या बॉक्सवर टिक करा आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.

तुमचा अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही या संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी मी अर्ज केलेल्या बाबी या बटनावर क्लिक करा.

छाननी अंतर्गत अर्ज या बटनावर क्लिक करा. या ठिकाणी आपला अर्ज दिसत आहे. अर्ज जर मंजूर झला तर तो मंजूर अर्ज या रकान्यामध्ये दिसेल शिवाय तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर या संदर्भात तुम्हाला संदेश देखील येईल.

अशा पद्धतीने ३० जून २०२४ पर्यंत तुम्ही नॅनो युरिया किंवा नॅनो डीएपी खतांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता धन्यवाद. नॅनो युरियासाठी ऑनलाईन अर्ज करून द्या काही अडचण आल्यास कमेंट्स करा.

नॅनो युरियासाठी किती मिळेल अनुदान?

महाराष्ट्र शासनाकडून लिक्विड नॅनो युरियासाठी ५० टक्के अनुदान दिले जाते.

कसा करावा लागेल अर्ज?

नॅनो युरिया व नॅनो डीएपी खतांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो हा अर्ज कसा करावा या संदर्भात या लेखामध्ये व्हिडीओ सहित संपूर्ण माहिती दिलेली आहे.

नॅनो युरिया अनुदान मिळविण्यासाठी कोठे करावा लागेल अर्ज

महाडीबीटी या शेतकरी वेबसाईटवर नॅनो युरिया अनुदान मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *