शासनाने जाहीर केलेल्या 5 हजार प्रती हेक्टर मदतीच्या मंजूर याद्या आता गावानुसार प्रसिद्ध केल्या जात आहेत. तुमचे जर या मंजूर यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला देखील हे अनुदान मिळणार आहे.
या लेखाच्या सर्वात शेवटी या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडीओ दिला आहे तो देखील नक्की पहा. जेणे करून तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने हि माहिती कळेल.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे परंतु हे अनुदान त्यांनाच मिळणार आहे ज्यांनी 2023 मध्ये त्यांच्या शेतातील कपाशी किंवा सोयाबीन पिकांची इ पिक पाहणी केली असेल.
तुम्ही देखील 2023 मध्ये तुमच्या शेतातील पिकांची ई पिक पाहणी केली असेल तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.
कृषी सहाय्यक यांच्याकडून 5 हजार रुपये प्रती हेक्टर मदतीच्या याद्या लावण्यात येत आहेत. तुमचे जर या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला देखील लाभ मिळणार आहे.
हि काही नुकसानभरपाई नाही तर मागील वर्षी सोयाबीन आणि कापूस पिकांना खूप कमी भाव मिळाला यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान सोसावे लागले हि नुकसानभरपाई त्यांना विशेष आर्थिक मदती अंतर्गत देण्यात येत आहे.
खालील योजनेचा पण लाभ घ्या.
5 हजार प्रती हेक्टर कोठे बघावी यादी
हि आर्थिक मदत मिळविण्यासाठी सगळ्यात अगोदर तुमच्या ग्रामपंचायतमध्ये मदतीच्या याद्या लावण्यात येईल. ग्रामपंचायत कार्यालयात हि यादी तुम्हाला बघावयास मिळेल.
तुमचे नाव जर या यादीमध्ये असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. हि आर्थिक मदत देण्यासंदर्भात 29 जुलै 2024 रोजी शासनाच्या वतीने जी आर काढण्यात आला होता.
यामध्ये हि मदत कशा पद्धतीने दिली जाणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
5 हजार रुपये प्रती हेक्टर मदतीसंदर्भातील जी आर डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
कशी मिळेल 5 हजार प्रती हेक्टर मदत
तुमच्या तालुक्यातील कृषी विभागाकडून लाभार्थी यादी प्रसिद्द केली जाईल. या यादीमध्ये तुमचे नाव असले तर तुम्हाला एक संमतीपत्र कृषी विभागाला सादर करावे लागेल.
हे संमतीपत्र तुमचा आधारचा डाटा शासनाने वापरल्यास तुमची काही हरकत नाही या संदर्भातील आहे.
खालील माहिती सादर करावी लागेल संमतीपत्रामध्ये
लाभार्थ्याचे मराठीमधील संपूर्ण नाव.
इंग्रजीमधील संपूर्ण नाव.
गाव, तालुका व जिल्हा.
मोबाईल क्रमांक
दिनांक.
वरील संपूर्ण माहिती तुम्हाला या संमतीपत्रामध्ये लिहावी लागणार आहे.
संमतीपत्राचा नमुना डाउनलोड करा
या संमतीपत्राचा नमुना जर तुम्हाला हवा असेल तर खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हा नमुना तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करू शकता.
संमतीपत्राचा नमुना डाउनलोड करा.
शिवाय जमिनीचे मालक हे संयुक्त खातेदार असेल तर त्यांच्यासाठी वेगळे संयुक्त खातेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
जमीन सामाईक क्षेत्रामध्ये असेल तर अशावेळी हे ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या कृषी सहाय्यक यांना द्यावे लागणार आहे जेणे करून तुम्हाला या अनुदानाचा लाभ मिळेल.
खालील लिंकवर क्लिक करून सामाईक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्या.
अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी संमतीपत्रक सादर केल्यानंतर प्रती हेक्टरी 5 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहितीचा व्हिडीओ पहा.
अशा पद्धतीने तुम्ही 5 हजार प्रती हेक्टर मदत मिळविण्यासाठी अर्ज करू शकता.