रिक्षा अनुदान अर्ज सुरु झाले असून पात्र लाभार्थ्यांनी लगेच अर्ज सादर करून द्यावेत असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वतः व्यवसाय सरू करता यावा यासाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या वतीने अनुदान देण्यात येते.
दिव्यांगाना हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही रिक्षा अर्थात फिरत्या वाहनावरील दुकान यासाठी जास्तीत जास्त ३ लाख ७५ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ६ फेब्रुवारी २०२५ हि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 भांडे अर्ज pdf मध्ये डाउनलोड करा
व्यावसायिक रिक्षासाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा या संदर्भातील संपूर्ण माहितीचा व्हिडीओ या लेखाच्या शेवटी देण्यात आलेला आहे त्याध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
रिक्षा अनुदान अर्ज कोणत्या व्यक्ती आहेत पात्र
या योजनेचा लाभ केवळ राज्यातील दिव्यांग व्यक्तींना मिळणार आहे. ज्या व्यक्ती ४० टक्के पेक्षा जास्त अपंग आहेत अशा व्यक्ती या योजनेसाठी अर्ज सादर करू शकतात.
दिनांक २२ जानेवारी २०२५ ते २ फेब्रुवारी २०२५ असा ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे. या कालावधीत MSHFDC या वेबसाईटवर जावून अर्ज सादर करावे लागणार आहे.
अर्ज सादर करतांना काही समस्या आली तर यासाठी MSHFDC या वेबसाईटवर मदतीसाठी संपर्क नंबर आणि इमेल आयडी देण्यात आलेला आहे.
सर्वसामान्य व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी पात्रता
इ रिक्षा अनुदान मिळविण्यासाठी जी पात्रता आहे ती खालीलप्रमाणे आहे.
अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे अनिवार्य आहे.
अर्जदाराकडे ४० टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
UDID प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.
अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्षे असावे.
वार्षिक उत्पन्न २.५० पेक्षा जास्त नसावे.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
ई रिक्षा अनुदान मिळविण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.
अर्जदाराचा फोटो.
अर्जदाराची स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करणे.
जातीचा दाखला.
अधिवास प्रमाणपत्र.
निवासी पुरावा.
दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र.
UDID प्रमाणपत्र.
ओळखपत्र.
बँक पासबुकचे पहिले पान स्कॅन केलेले असावे.
वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रे तयार ठेवावे आणि त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात करावी.
असा करा ई रिक्षा अनुदान ऑनलाईन अर्ज
ई रिक्षा ऑनलाईन अर्ज चार टप्प्यामध्ये करता येणार आहे.
योजना संदर्भातील सूचना वाचणे.
अर्ज सादर करणे आणि कागदपत्रे अपलोड करणे.
घोषणा तपासणे आणि अर्ज सादर करणे.
अर्जाची पोच पावती मिळविणे.
वरीलप्रमाणे ४ टप्प्यामध्ये हा रिक्षा अनुदान अर्ज सादर करता येणार आहे. रिक्षा अनुदान अर्ज सादर कसा करावा या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा.