Voter List SIR 2002 Maharashtra. सध्या महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत कर्मचारी आणि BLO (Booth Level Officer) यांच्या माध्यमातून WhatsApp वर एक महत्त्वाचा मेसेज व्हायरल होत आहे.
या मेसेजनुसार:
2002 नंतर लग्न झालेल्या महिलांनी त्यांच्या माहेरातील आई-वडिलांची मतदार यादीतील माहिती जमा करायची आहे.
यामुळे अनेकांना सासुरवाडीला फोन करून माहिती विचारावी लागते, ज्यामुळे अनावश्यक त्रास होतो. पण आता ही माहिती तुम्ही घरबसल्या मोबाईलवर 5 मिनिटांत शोधू शकता.
खालील माहिती पण वाचा
Voter List SIR 2002 Maharashtra ही माहिती का मागवली जात आहे? SIR म्हणजे काय?
ही प्रक्रिया SIR (Special Intensive Revision) म्हणजेच मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेचा भाग आहे.
यामागील मुख्य उद्दिष्टे:
- मृत मतदारांची नावे काढणे.
- डुप्लिकेट (दुबार) नावे हटवणे.
- चुकीची किंवा बेकायदेशीर नोंदणी काढणे,
मतदार यादी अचूक बनवणे.
खालील योजनेचा पण लाभ घ्या.
BLO ला नेमकी कोणती माहिती लागते?
तुमच्या पत्नीच्या माहेरातील (2002 मधील) खालील माहिती आवश्यक आहे:
- विधानसभा मतदारसंघ क्रमांक.
- मतदार यादी भाग क्रमांक.
- मतदार अनुक्रमांक.
Voter List SIR 2002 Maharashtra मोबाईलवर माहिती कशी शोधायची? (Step-by-Step Guide)
संपूर्ण माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
Step 1: अधिकृत वेबसाईट उघडा.
ब्राउझरमध्ये https://voters.eci.gov.in/ ओपन करा.
Step 2: Voter Services निवडा.
होमपेजवर “Voter Services” वर क्लिक करा.
Step 3: SIR Search ऑप्शन निवडा.
Search your name in last SIR.
Search in Last SIR eroll.
Step 4: माहिती भरा.
फॉर्ममध्ये खालील माहिती टाका:
- State: महाराष्ट्र.
- Assembly Constituency: तालुका/मतदारसंघ.
- Polling Station: गाव.
नंतर View वर क्लिक करा.
Step 5: 2002 मतदार यादी तपासा.
आता तुम्हाला:
- मतदारसंघ क्रमांक.
- भाग क्रमांक.
वर दिसेल.
👉 खाली स्क्रोल करून नाव शोधा.
👉 नावाच्या बाजूला अनुक्रमांक (Serial Number) मिळेल.
आता तुम्हाला सासू-सासऱ्यांना त्रास देण्याची गरज नाही 🙌
Voter List SIR 2002 Maharashtraही माहिती तुम्ही घरबसल्या सहज मिळवू शकता आणि लगेच BLO कडे जमा करू शकता यामुळे सरकारी प्रक्रियेला मदत होते व तुमचे मतदार यादीतील नाव सुरक्षित राहते.
SIR (Special Intensive Revision) ही निवडणूक आयोगाची मतदार यादी अद्ययावत करण्याची विशेष मोहीम आहे. या प्रक्रियेत चुकीची, दुबार किंवा मृत मतदारांची नावे काढली जातात.
2002 नंतर लग्न झालेल्या महिलांची जुनी नोंद तपासण्यासाठी त्यांच्या माहेरातील आई-वडिलांची मतदार यादीतील माहिती मागवली जाते, जेणेकरून मतदार यादी अचूक राहील.
Part Number (भाग क्रमांक): मतदार यादीचा विभाग क्रमांक.
Serial Number (अनुक्रमांक): त्या यादीतील मतदाराचा क्रमांक.
तुम्ही अधिकृत वेबसाईट (eci.gov.in) वर जाऊन “Search your name in last SIR” पर्याय वापरून ही माहिती घरबसल्या मोबाईलवर शोधू शकता.
तुम्हाला खालील माहिती आवश्यक असते:
राज्य (State).
विधानसभा मतदारसंघ (Assembly Constituency).
गाव / पोलिंग स्टेशन.
जर मतदार यादीत नाव सापडले नाही, तर:
स्पेलिंग तपासा.
वेगळ्या कुटुंब सदस्याचे नाव शोधा.
किंवा BLO (Booth Level Officer) शी संपर्क करा.