शेतकरी मित्र पदभरती कशी असेल किती मिळेल मानधन पहा संपूर्ण माहिती.

शेतकरी मित्र पदभरती कशी असेल किती मिळेल मानधन पहा संपूर्ण माहिती.

जाणून घेवूयात तकरी मित्र पदभरती संदर्भात सविस्तर माहिती.

राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक गावामध्ये एक “शेतकरी मित्र” नियुक्त केला जाणार आहे. ही माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली आहे.

कृषी मंत्र्याच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होणार आहे. तरुणांना रोजगार तर मिळेलच शिवाय शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे.

वास्तविक पाहता शेतकरी मित्र किंवा कृषी मित्र पदभरतीची हि फक्त घोषणा आहे याचा अद्याप शासन निर्णय नाही. शासन निर्णय निर्गमित झाल्यावरच हि पदभरती कशा पद्धतीने केली जाणार आहे हे निश्चित होईल.

SIR मतदान यादीमध्ये असे शोधा तुमच्या पत्नीच्या आईवडिलांचे नाव.

Voter List SIR 2002 Maharashtra

११ हजार शेतकरी मित्रांना मिळणार रोजगार

पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेतील दत्तात्रेय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी मित्र योजना सुरु होणार आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांना शेतीविषयक सल्ला, आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध शासकीय योजनांची माहिती वेळेवर मिळावी, हा या शेतकरी मित्र किंवा कृषी मित्र योजनेचा मुख्य उद्देश आहे.

यापूर्वीच राज्यात कृषी पर्यवेक्षक म्हणून 11,587 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता शेतकरी मित्र हि योजना आत्मा योजना अंतर्गत राबविली जाणार आहे.

शेतकरी मित्र योजनेसाठी पात्रता

राज्यातील प्रत्येक गावासाठी एक शेतकरी मित्र नेमला जावू शकतो. या शेतकरी मित्र पदासाठी अनुभवी, प्रयोगशील आणि नवीन तंत्रज्ञान स्वीकारणारे शेतकरी निवडले जाणार आहेत.

या निवडीसाठी आवश्यक अटी व शर्ती शासनाकडून निश्चित केल्या जाणार आहेत या संदर्भात लवकरच शासन निर्णय निर्गमित होऊ शकतो.

सध्यातरी हि फक्त घोषणाच आहे जेंव्हा शासनाकडून जीआर काढण्यात येईल तेंव्हा खऱ्या अर्थाने या योजनेचे स्वरूप कसे असणार आहे या संदर्भात माहिती मिळेल.

काय काम करावे लागेल शेतकरी मित्र यांना

नियुक्त करण्यात आलेला शेतकरी मित्र यांना संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्यासोबतकरण्याची संधी मिळू शकते.

शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणे.

शासकीय योजना समजावून सांगणे.

शेतीतील नव्या पद्धतींचा प्रचार करणे.

ही त्याची प्रमुख जबाबदारी असू शकेल.

शेतकरी मित्रांना किती मानधन मिळेल.

निवड झालेल्या शेतकरी मित्रांना मानधन देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. निवड झालेल्या प्रत्येक शेतकरी मित्राला वर्षाला 18,000 रुपये इतके मानधन दिले जाणार आहे. हे मानधन दर तीन महिन्यांनी वितरित केले जाईल.

ही योजना 1 जूनपासून लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे लवकरच या नियुक्ती प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

पात्रता निकष

या भरतीमध्ये महिलांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. एकूण निवडींपैकी 30 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकरी मित्र होण्यासाठी काही पात्रता निकषही असे असू शकतात.

उमेदवाराचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

त्याला चांगले संवाद कौशल्य असावे.

समाजकार्याची आवड असणे आवश्यक आहे.

सोशल मीडियाचा वापर करता येणे गरजेचे आहे.

शैक्षणिक पात्रतेबाबत, उमेदवाराने किमान माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेले असावे. या सर्व अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड केली जावू शकते.

तरुणांसाठी रोजगार निर्मिती

पहिल्या टप्प्यात राज्यभरात 11,587 शेतकरी मित्रांची नियुक्ती केली जाणार आहे. या नियुक्तीची संपूर्ण प्रक्रिया जिल्हास्तरावर पार पडणार असल्याचे दत्तात्रेय भरणे यांनी स्पष्ट केले आहे.

एकंदरीत, ही योजना शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनाची मजबूत साखळी निर्माण करणारी ठरणार असून ग्रामीण भागातील तरुणांसाठी रोजगाराची नवी दिशा देणारी ठरेल.

लेखाचा सारांश

तकरी मित्र योजना ही शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण तरुणांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी योजना आहे. सध्या ही फक्त घोषणा असली तरी GR आल्यानंतर या योजनेचे संपूर्ण स्वरूप स्पष्ट होईल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अधिकृत अपडेटवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.

शेतकरी मित्र योजना काय आहे?

शेतकरी मित्र योजना ही राज्य शासनाची प्रस्तावित योजना आहे. यामध्ये प्रत्येक गावामध्ये एक शेतकरी मित्र नियुक्त करून शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन देण्याचा शासनाचा उद्देश आहे.

ही योजना सुरू झाली आहे का?

नाही. सध्या या योजनेची फक्त घोषणा करण्यात आलेली आहे. अधिकृत शासन निर्णय (GR) अद्याप आलेला नाही.

शेतकरी मित्र पदासाठी अर्ज कधी सुरू होतील?

अर्ज प्रक्रिया शासन निर्णय जाहीर झाल्यानंतरच सुरू होईल. त्यानंतरच अर्जाची तारीख आणि पद्धत स्पष्ट होईल.

किती शेतकरी मित्रांची भरती होणार आहे?

पहिल्या टप्प्यात सुमारे 11,587 शेतकरी मित्रांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

शेतकरी मित्रांना किती मानधन मिळेल?

निवड झालेल्या उमेदवारांना वर्षाला सुमारे ₹18,000 रुपये मानधन मिळेल. हे मानधन दर 3 महिन्यांनी दिले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *