शासनाच्या वतीने कोविड १९ या आजारामुळे मयत झालेल्यांच्या वारसदारांना ५०००० एवढे सानूग्रह अनुदान देण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय १२ ऑक्टोबर २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुमच्या घरातील एखादी व्यक्ती कोरोनामुळे मृत झाली असेल तर तुम्हाला ५०,००० रुपये सानूग्रह अनुदान म्हणून शासनाकडून मिळू शकतात.
विविध योजनांची माहिती मिळवा तुमच्या मोबाईलवर. जॉईन व्हा आमच्या whatsapp group मध्ये
५०००० रुपये सानूग्रह अनुदान संदर्भातील शासनाची प्रेस नोट बघा.
५०,००० रुपये सानूग्रह अनुदान संदर्भातील एक प्रेस नोट महाराष्ट्र शासनाच्या https://jalna.gov.in/ प्रकाशित करण्यात आलेली आहे. हि प्रेस नोट बघण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
- https://jalna.gov.in/ या वेब्साईटवर जा.
- वेबसाईटची भाषा मराठी करून घ्या.
- मेनूबारवर दिसत असलेल्या मध्यम व दालने या पर्यायाला टच करा.
- सूचना या बटनावर क्लिक करा.
- घोषणा या बटनावर टच किंवा क्लिक करा.
५०००० सानूग्रह अनुदान मिळविण्यासाठी पात्रता.
खालील प्रमाणे दिलेल्या व्यक्तींना ५०००० सानूग्रह अनुदान मिळू शकेल.
- आरोग्य कर्मचारी.
- होमगार्ड.
- जिल्हा प्रशासन.
- पोलीस.
- अंगणवाडी कर्मचारी.
- लेखा व कोषागरे.
- अन्न व नगरी पुरवठा.
- पाणी पुरवठा व स्वच्छता.
- घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले अन्य विभागांचे कर्मचारी.
इत्यादी कर्मचाऱ्यानां हा ५०,००० सानूग्रह अनुदान निधी मिळणार आहे. कोविड संबधित कर्तव्य पार पाडत असतांना जर अशा कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सानूग्रह अनुदान म्हणून यांना ५०००० रुपये मिळणार आहेत.
मयतांच्या वारसांना मिळणार मदत
कोरोना प्रतिबंध करण्यासंदर्भात कर्तव्य बजावत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना हा सानुग्रह निधी मिळू शकणार आहे. त्यामुळे मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांनी आपल्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील संबधीत अधिकारी यांच्याशी संपर्क साधून हे अनुदान मिळण्याची पद्दत कशी आहे या संदर्भात माहिती जाणून घ्यावी.
लवकरच सरू होणार ऑनलाईन अर्ज covid grant application
५०,००० रुपये सानूग्रह अनुदान मिळविण्यासाठी मयतांच्या वारसांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत. लवकरच ऑनलाईन अर्ज कार्य पद्धती लवकरच सुरु करण्यात येईल असे शासनाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा अप्पती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालयाशी संपर्क साधावा.
उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळणार १० लाख रुपयापर्यंत सबसिडी
विविध शासकीय योजनांची माहिती मिळवा तुमच्या मोबाईलवर.
अनेक शेतकरी बांधवांना अजूनही शेती संबधित योजनांची माहिती नसण्याची शक्यता असते त्यामुळे शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता असते. सर्व शासकीय योजनांची माहिती मिळविण्यासाठी डिजिटल डीजी युट्युब चॅनलला भेट द्या त्यासाठी येथे क्लिक करा.