प्रधानमंत्री कुसुम योजना अंतर्गत सौर कृषी पंप योजना सुरु असून यासाठी आता नवीन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. सौर कृषी पंपासाठी अर्ज करतांना यापूर्वी कोणताही चार्ज द्यावा लागत नसे आता मात्र १०० रुपये शुल्क शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहेत. या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. या योजना संदर्भातील व्हिडीओ या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेला आहे.
सौर कृषी पंप योजनेचा अधिक माहितीसाठी येथे टच करा.
शेतकऱ्यांना अत्यंत आवश्यक अशी हि सौर कृषी पंप योजना.
सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहे. शेतकऱ्यांना शेताला पाणी देण्यासाठी जीवाचे रान करावे लागते. रात्री अपरात्री शेताला पाणी देत असतांना अनेक दुर्घटना घडल्याचा अनेक बातम्या दूरदर्शन किंवा वृत्तपत्रामध्ये आलेल्याचे अनेक उदाहरणे आहेत. अशावेळी जर सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांना मिळाली तर शेतकरी आपल्या शेताला दिवसा पाणी देवू शकतात.
विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आमच्या टेलीग्राम ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि मोफत माहिती मिळवा तुमच्या मोबाईलवर. ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी येथे टच करा.
सौर कृषी पंप योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
सौर कृषी पंप योजना सुरु झाली तर खरी परंतु या योजनेचे अर्ज लगेच संपतात अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. अनेक शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतात सौर पंप बसवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू इच्छित आहेत. सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावयास घेल्यास कोटा संपलेला आहे असा संदेश शेतकऱ्यांना मिळतो परिणामी शेतकऱ्यांचा हिरमोड होतो.
शेळी पालन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु. असा करा ऑनलाईन अर्ज
अर्ज करण्याअगोदर जाणून घ्या तुमच्या गावासाठी सौर कृषी पंपाचा कोटा किती शिल्लक आहे.
सौर कृषी पंप म्हणजेच सोलर पंप योजनेसाठी अर्ज करतांना शेतकरी बांधवाना अगोरच कोटा किती आहे याची माहिती मिळावी या उद्देशाने ऑनलाईन अर्ज करण्याची हि नवीन पद्धत सुरु करण्यात आलेली आहे. सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याअगोदर आता शेतकऱ्यांना आपल्या गावासाठी किती सौर कृषी पंपाचा कोटा शिल्लक आहे हे कळणार आहे आणि त्यानुसार शेतकरी बांधव यासाठी अर्ज करू शकणार आहेत.
आता प्रधानमंत्री कुसुम योजनेतून मिळणार सौर कृषी पंप योजनेचा लाभ.
काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना योजना सुरु झाली होती परंतु ती योजना आता बंद झाली असून ज्या शेतकरी बांधवानी या योजनेतून सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केले होते त्यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेतून लाभ दिला जाणार आहे. सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवाच्या अक्षरशः उड्या पडलेल्या आहेत याचे कारण म्हणजे शेतीसाठी नसणारी लाईट किंवा रात्री अपरात्री शेतीची पाणीपाळी वाचविणे होय.
शेतकरी बांधवांनी प्रधानमंत्री कुसुम योजनेचा लाभ घ्यावा.
शेतकऱ्यांच्या गावासाठी सौर कृषी पंपचा कोटा उपलब्ध असेल तर शेतकरी बांधवांनी नक्कीच या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करून द्यावा. तुमच्या गावासाठी सौर कृषी पंप योजनेचा कोटा किती शिल्लक आहे ते खालील प्रमाणे तुम्ही बघू शकता.
- तुमच्या संगणकामधील ब्राउजर ओपन करा.
- त्या ब्राउजरच्या सर्च बारमध्ये https://www.mahaurja.com/meda/ हि लिंक टाईप करा आणि सर्च करा.
- जसे हि तुम्ही वरील लिंक टाकून सर्च कराल त्यावेळी तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर महाउर्जा वेबसाईट ओपन होईल.
- या वेबसाईटच्या उजव्या बाजूला महाकृषी उर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज लिंक असेल या लिंकवर क्लिक करा.
- वरील लिंकला क्लिक करताच तुम्ही कुसुम सौर उर्जा ऑनलाईन पेजवर जाल.
खालील प्रमाणे बघा तुमच्या गावासाठी किती सौर कृषी पंपाचा कोटा शिल्लक आहे.
या ठिकाणी तुम्हाला सेफ विलेज लिस्ट safe village list दिसेल त्या लिंकवर क्लिक करा. जर तुमच्या गावाचे नाव या लिस्टमध्ये असेल तर डझेल पंप नाही हा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि नाव नसेल तर डीझेल पंप आहे असा पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. बाकी माहिती खालीलप्रमाणे भरायची आहे.
- शेतकऱ्याचा आधार नंबर
- शेतकऱ्याचा जिल्हा.
- तालुका.
- गाव.
- मोबाईल नंबर.
- जात निवडा.
- इमेल आयडी असेल तर टाका.
- सर्वात शेवटी Payment for online application या पर्यायावर क्लिक करा.
कोटा शिल्लक असेल तर सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करून द्या.
जसेही तुम्ही Payment for online application या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या गावासाठी st, st, किंवा open वर्गासाठी किती सौर कृषी पंप कोटा शिल्लक आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल. तुम्ही ज्या जातीचे असाल त्या कास्टसाठी कोटा उपलब्ध असेल तर पुढे प्रोसेस करून तुमचा ऑनलाईन अर्ज करून द्या.