Atma yojana Maharashtra
What is Atma yojana Maharashtra विषयी मित्रांनो आज आपण जाऊन घेणार आहोत. शेतकरी गट योजना काय आहे तसेच आत्मा योजना काय आहे. आत्मा अंतर्गत शेतकरी गट नोंदणी कशी करावी. महाराष्ट्र कृषि विभाग अंतर्गत आत्मा योजना शेतकऱ्यांसाठी कशी फायदेशीर ठरू शकते तर ह्या सर्व मुद्द्यावर या ठिकाणी आपण प्रकाश टाकणार आहोत.
Atma yojana Maharashtra विषयी मोफत माहिती मिळवा
digital dg या युट्युब चॅनलला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. आमच्या digitaldg.in या वेबसाइटवर देखील शेतकरी अनुदान योजनेविषयी माहिती दिली जाते तर विविध शासकीय योजनांच्या मोफत माहितीसाठी आमच्या वेबसाईला देखील भेट देत राहा.
आणि ज्यांना आमच्या वेबसाईट किंवा digital dg युट्युब चॅनल विषयी माहिती नसेल त्यांना हि माहिती देत चला जेणे करून गरजू शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेची माहिती मिळेल आणि ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी असेल तर स्मार्ट योजनेसाठी Atma yojana Maharashtra ऑनलाईन अर्ज करून शेतकरी ६० टक्क्यापर्यंत अनुदान मिळवू शकतात त्यासाठी शेतकरी गटांनी ऑनलाईन अर्ज कसा करावा हा व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा किंवा खालील व्हिडीओ बघा
आत्मा योजना काय आहे Atma yojana Maharashtra
शेतकरी गट योजनेविषयी जाणून घेण्य अगोदर आपण आत्मा योजना काय आहे जाणून घेणार आहोत. Agricultural Technology Management Agency म्हणजेच ATMA. आत्मा हि योजना २००५ ते २००६ या वर्षी सुरु करण्यात आली. शेतकरी समूह, संस्था (NGO ) कृषी विज्ञान केंद्र इत्यादी आत्मा योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. शेतकरी गट केल्यास शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ मिळू शकतो.
Atma yojana Maharashtra राबविण्यासाठी एकीचे बळ महत्वाचे
मित्रांनो लहानपणी शालेय शिक्षणाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये एकीचे बळ हि गोष्ठ आपल्याला शिकविण्यात आली होती. एक कडी मुलाला तोडण्यास सांगण्यात येते तो मुलगा ती कडी अगदी सहजपणे तोडतो. मग तशाच दहा काड्यांचा समूह करून त्याच मुलाला पुन्हा तोडण्यास सांगण्यात येते.
पण या वेळेस मात्र तो मुलगा त्या कड्या तोडू शकत नाही या उदाहरणातून एकीचे बळ हि संकल्पना स्पष्ठ होते. तुम्हाला कदाचित ती गोष्ठ आठवत असेल या गोष्टीचा या ठिकाणी संदर्भ देण्याचे कारण म्हणजेच एकीचे बळ हि संकल्पना कोणत्याही क्षेत्रात लागू होते.
बँकिंग क्षेत्र असो. कॉर्पोरेट क्षेत्र असो, ट्रान्सपोर्ट क्षेत्र असो कि मग आपले शेतीक्षेत्र असो एकीचे बळ हि संकल्पना या ठिकाणी मोठ्या प्रभावीपणे काम करते.
Atma yojana Maharashtra योजनेचा लाभ घ्या.
आज बरेच क्षेत्र हे संघटीत आहेत परंतु शेतकरी अजूनही संघटीत नाही. उदाहरणच द्यावयाचे झाल्यास बँकेतील कर्मचार्यांना पगार वाढ पाहिजे असली के ते संप करतात मग त्यांना पगार वाढ दिली जाते.
शेतकऱ्यांचा कांदा थोडा जर महाग झालं तर पांढरपेशी लोक लगेच संघटीत होऊन यावर आवाज उठवितात, करण्खाण्यातील कामगारांना दिवाळी बोनस वेळेवर नाही मिळाला तर ते लगेच संप करतात सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे कि तुमचा समूह असेल किंवा संघटना असेल तर कोणतेही इत्सिप्त साध्य करणे सोपे जाते.
महाराष्ट्रातील सर्व शेतकरी गटांची माहिती एका क्लिकवर
तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या तालुक्यमध्ये कोणकोणते आत्मा अंतर्गत कोणकोणते शेतकरी गट निर्माण झाले आहेत हे जाणून घ्यावयाचे असेल तर खालील लिंकवर क्लिक करा.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वेबसाईटची लिंक या ठिकाणी दिलेली आहे या लिंकवर क्लिक करताच तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वेबसाईटवर जाल.
या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर त्यासमोरील pdf file आयकॉनवर क्लिक करा आणि एका क्लिकवर तुमच्या जिल्ह्यातील आत्मा अंतर्गत जितके हि शेतकरी गट निर्माण झाले असतील त्या सर्व शेतकरी गटांच्या अध्यक्ष व सचिव यांचे मोबाईल नंबर तुम्हाला दिसेल त्याच प्रमाणे त्यांनी कोणत्या उद्देशाने गट निर्माण केला, त्यांच्या गटाचे नाव इत्यादी संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल.
गाव व गाव परिसरातील शेतकरी, शेतकरी गट किंवा शेतकरी कंपनी निर्माण करू शकतात.
Atma shetkari gat आत्मा शेतकरी गट
एका शेतकरी गटामध्ये कमीत कमी १५ शेतकरी एकत्रित आल्यास ते आत्मा योजनेंतर्गत शेतकरी गट म्हणून नोंदणी करू शकतात. शेतकरी गट नोंदणी केल्यास आणि ‘आत्मा’ च्या नियमाप्रमाणे चालविल्यास अशा शेतकरी गटांना अनेक योजनांचा लाभ घेता येतो.
शेतकरी गट स्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना अगोदर एकत्रित येणे गरजेचे आहे. शेतकरी कोणकोणती पिके घेतात त्यावर आधारित त्यांना शेतकरी गट तयार करता येतो यासाठी गावातील किंवा गाव परिसरातील शेतकरी एकत्र येवून शेतकरी गट निर्माण करू शकतात.
अनेक शेतकरी गट मिळून शेतकरी कंपनी निर्माण करू शकतात. अशा यशस्वीपणे नोंदणी झालेल्या सक्रीय गटास किंवा शेतकरी कंपनीस अनेक शासकीय योजनांचा लाभ घेता येतो.
आत्मा अंतर्गत शेतकरी गट नोंदणी प्रक्रिया.
तालुक्याच्या ठिकाणी आत्मा या योजनेसंदर्भात संबधित अधिकारी साहेबांकडून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. वेगवेगळ्या पिक निहाय किंवा कृषी उत्पादन निहाय शेतकरी गट स्थापन केल्यानंतर शेतकऱ्यांना शेतकरी गट नोंदणीसाठी विहित नमुन्यात कृषी विभागाच्या आत्मा योजनेच्या अधिकारी साहेबांकडे शेतकरी गट नोंदणीचा अर्ज सादर करावा लागतो.
शेतकरी गट नोंदणीचा फॉर्म तालुक्याच्या संबधित कार्यालयात तुम्हाला मिळेल किंवा झेरॉक्स सेंटरवर देखील मिळू शकतो किंवा तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून देखील शेतकरी गट नोंदणीचा ओरिजिनल फॉर्म तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्या कॉम्प्युटरवर डाउनलोड करू शकता.
शेतकरी गट नोंदणीचा ओरिजिनल फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आत्मा-शेतकरी-गट-नोंदणी-ओरिजिनल-अर्ज-1.pdf (8079 downloads )PDF चा पासवर्ड 8010 आहे.
( सूचना -वरील pdf फाईल मध्ये शेतकरी गट नोंदणीसाठी लागणारा ओरिजिनल म्हणजेच MS word मध्ये टाईप केलेला फॉर्म आहे. ओरीजनल हा शब्द यासाठी वापरलेला आहे कि हा अर्ज कुठल्याही प्रकारे झेरॉक्स किंवा स्कॅन केलाला नाही . हाअर्ज फक्त नमुना म्हणून ठेवलेला आहे. शेतकरी गट निर्माण करण्यासाठी या अर्जासोबत कदाचित आवश्यकतेनुसार कमी किंवा अधिक कागदपत्रे जोडावी लागतील.अधिक माहितीसाठी तुमच्या तालुक्यातील आत्मा अधिकारी साहेबांशी चर्चा करा.)
आत्मा अंतर्गत शेतकरी गट नोंदणीकेल्यानंतर शेतकरी गटाने त्यांच्या ठरलेल्या धेण्यानुसार चांगले कार्य करणे अपेक्षित आहे आणि शेतकरी गाटासंदार्भातील नियम पाळणे आवश्यक आहे.
शेतकरी गट स्थापन झाल्यानंतर गटाची नियमित बैठक घेतली जावी, शेतकरी गटांनी सर्व अभिलेखे, वेगवेगळ्या नोंद वह्या, रजिस्टर तसेच गटाचे इतर रेकॉर्ड ठेवणे आवश्यक आहे जसे कि शेतकरी गटाच्या बैठकांचे इतिवृत्त, बँक पासबूक रकमांचा हिशेब इत्यादी.
शेतकरी गटासाठी काही मार्गदर्शक सूचना व माहितीची pdf फाईल खालील लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्या आणि सविस्तर वाचून घ्या.
शेतकरी-गट-मार्गदर्शक-सूचना..pdf (4130 downloads )आत्मा शेती योजना महाराष्ट्र Atma agriculture scheme Maharashtra
मित्रांनो आता आपण जाणून घेवूयात कि कृषि विभाग आत्मा अंतर्गत कोणकोणत्या योजना महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांना मिळू शकतात. कृषी विभाग योजना महाराष्ट्र अंतर्गत आत्मा शेतकरी गटांना कौशल्य विकासासाठी ५००० प्रती शेतकरी गट यांना अर्थसहाय्य केले जाते.
तसेच सक्षम शेतकरी गटास बीजभांडवल फिरता निधी यासाठी १०,००० रुपये प्रती शेतकरी गट अर्थ सहाय्य केले जाते. याव्यतिरिक्त आत्मा अंतर्गत महिलांचे अन्नसुरक्षा गटास पशुसंवर्धन, शेळीपालन, कुक्कुट पालन, परसबाग इत्यादी व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रशिक्षण प्रकाशने व निविष्ठा खरेदी करण्यासाठी सुद्धा १०,००० बीज भांडवल देण्यात येते.
शिवाय शेतकरी गटासाठी अभ्यास दौरे सुद्धा आयोजित केले जातात यामध्ये विविध भागातील पिक पद्धती बघून तुमच्या पिक पद्धतीमध्ये बदल करू शकता.
आत्मा अंतर्गत निर्माण झालेल्या शेतकरी गटाने जर चांगल्या पद्धतीने संघटीत राहून कार्य केले तर अशा उतृष्ट कार्य करणाऱ्या गटास २०,००० रुपये पारितोषिक स्वरुपात दिले जाते.
आत्मा शेतकरी गट नोंदणी या लेखाचा सारांश
मित्रांनो शेतकरी बांधवानी संघटीत होऊन आत्मा योजनेंतर्गत शेतकरी गट स्थापन करावेत. एका शेतकरी गटामध्ये कमीत कमी १५ सदस्य असावेत शेतकरी गट स्थापन झाल्यावर विहित नमुन्यातील अर्ज तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावा.
शेतकरी गट नोंदणीचा ओरिजिनल अर्ज तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. डाउनलोडची लिंक या लेखामध्ये दिलेली आहे. शेतकरी गट स्थापन केल्यानंतर शेतकरी बांधवाना शासनाच्या विविध योजेचा लाभ घेता येईल.
Rasta magni arj शेत रस्ता कायदा व रस्त्याचे नियम
https://digitaldg.in/2020/11/23/rasta-magni-arj-shet-rasta-kayda/
Bhu Naksha महाराष्ट्र ऑनलाइन भू नक्शा बघा मोबाईलवर
https://digitaldg.in/2020/11/26/bhu-naksha-maharashtra-online/
I m intrested