पिक कर्ज २०२१ वाटप सुरु ऑनलाईन करा मागणी अर्ज

पिक कर्ज २०२१ वाटप सुरु ऑनलाईन करा मागणी अर्ज

पिक कर्ज २०२१ ( Bank crop loan 2021 )वाटप करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे. बँकामध्ये शक्यतो नेहमी गर्दीच असते याला काही अपवाद असू शकतात मात्र जर ग्रामीण भागातील बँकाचे गर्दीच्या बाबतीतील हाल बघितले तर तुम्हाला पुढे काहीही सांगण्याची गरज नाही ते तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहित आहे.

पिक कर्ज २०२१ मागणी अर्ज कसा भरावा हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.

पिक कर्ज २०२१ मागणीसाठी आता बँकेत जाण्याची गरज नाही घरूनच करा ऑनलाईन अर्ज.

गर्दी कमी करण्याचे शासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला जर पिक कर्ज हवे असेल तर आता बँकेत जाण्याची गरज नाही. पिक कर्ज २०२१ मागणीसाठी तुम्हाला अगोदर तुमच्या मोबाईलवरून एक online अर्ज भरावा लागेल. तो online अर्ज मग बँकेला पाठविला जाईल. तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे घेवून कोणत्या दिवसी बँकेत जावे लागणार आहे या संदर्भात तुम्हाला कर्ज देणारी बँक एक sms पाठवेल. त्या दिवशी तुम्हाला पिक कर्ज मागणीसाठी (crop loan demand ) बँकेत जावे लागणार आहे.

पिक कर्ज २०२१ मागणी अर्ज व त्यासाठी लागणारे कागदपत्रे Online crop loan demand and documents.

मित्रांनो पिक कर्ज २०२१ मागणीचा अर्ज अगदी सोपा आहे. हा अर्ज मोबाईलवरून अगदी सहजपणे कसा भरला जावू शकतो या संदर्भात मी तुम्हाला या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल अशा रीतीने या ठिकाणी माहिती सांगणार आहे. याही पुढे पिक मागणी अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे सादर करावी लागतात त्याबद्दल देखील या ठिकाणी मी माहिती देणार आहे जेणेकरून तुम्हाला कर्ज मिळणे अधिक सोपे होईल

बँक पिक कर्ज २०२१ लागणारी कागदपत्रे crop loan documents डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

पिक कर्ज कागदपत्रे
https://drive.google.com/file/d/1zXQXzlrooZRTsKgEzylUtFxRdtuEKRt9/view?usp=sharing

फसव्या लिंकपासून सावध राहा.

मित्रांनो एक महत्वाची बाब या ठिकाणी लक्षात घ्या कि हल्ली अनेक प्रकारच्या फसव्या लिंक WhatsApp फेसबुक याद्वारे पसरविल्या जातात. नेमकी खरी लिंक कोणती आहे ते लक्षात येत नाही. आता या ठिकाणी मी पिक कर्ज मागणीसाठी ज्या लिंकवर क्लिक करून माहिती भरा असे सांगत आहे ती लिंक कोठून आली हे देखील तुम्हाला कळायला हवे.

पिक कर्ज २०२१ मागणी अर्जाची गुगल लिंक

ज्या लिंकवर क्लिक करून पिक कर्ज मागणी अर्ज भरायचा आहे ती गुगल लिंक असून https://jalna.gov.in/ या शासकीय वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि तुम्हाला माहितच असेल कि ज्या वेबसाईटचे एक्सटेंशन .gov.in हे असते ती वेबसाईट शासकीय असते. त्यामुळे पिक कर्ज मागणीची हि लिंक खरी किंवा ओरिजिनल लिंक आहे. पिक कर्ज २०२१ मागणी अर्ज गुगल लिंक google document link मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.

गुगल डॉक्युमेंट लिंक

पिक कर्ज २०२१ मागणी अर्ज गुगल डॉक. लिंक

पिक कर्ज मागणी अर्ज २०२१ सादर करण्यापूर्वी खालील बाबी वाचून घ्या. गुगल डॉक्युमेंट लिंकवर क्लिक करताच पीक कर्ज मागणीसाठी भरावयाचा अर्ज (जिल्हा जालना) – 2021अशी एक सूचना तुम्हाला दिसेल. या ठिकाणी काही चुना तुम्हाला दिसतील जसे अ) लाल रंगाचे मार्क म्हणजेच स्टार असलेली माहिती भरणे अनिवार्य आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये कंपल्सरी म्हणतो. ब)शेतकऱ्याला पिक कर्ज हवे असेल तर त्या शेतकऱ्याने त्याचे नाव एकदाच व एकाच बँकेकडे पिक कर्ज मागणीसाठी नोंदविणे आवश्यक आहे. क) जर या अर्जामध्ये काही चुकीची माहिती भरल्यास आणि जर काही कार्यवाही झाली तर शेतकरी किंवा जो अर्जदार आहे तो स्वत: जबाबदार राहणार आहे.

ऑनलाईन पिक कर्ज २०२१ मागणी अर्ज खालील प्रमाणे सादर करा.

सुरुवातीला आपण पिक मागणीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा त्या संदर्भात अर्ज माहिती घेणार आहोत आणि त्यानंतर पिक कर्जासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात या विषयी जाणून घेवूयात.

ऑनलाईन पिक कर्ज २०२१ मागणी अर्ज.

  • गुगल लिंकवर क्लिक करा व पिक कर्ज मागणी अर्ज भरण्यास सुरुवात करा. ( अर्ज भरण्यास सुरुवात करण्यासाठी (गुगल लिंक) येथे क्लिक करा किंवा टच करा.
  • तुमचे नाव टाईप करा
  • तुमच्या वडिलांचे नाव टाईप करा
  • तुमचे आडनाव टाईप करा.
  • तुमचा मोबाईल नंबर म्हणजेच दूरध्वनी क्रमांक टाका
  • Next या बटनावर क्लिक करा किंवा टच करा.
  • आधार क्रमांक टाका आणि Next या बटनावर क्लिक करा किंवा टच करा.
  • तुमचा तालुका दिलेल्या यादीमधून निवडा
  • त्यानंतर पुन्हा एकदा Next या निळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करा
  • दिलेल्या यादीमधून तुमचे गाव निवडा आणि Next बटनावर टच करा.

हि झाली तुमची वैयक्तिक माहिती आता पुढील माहिती बॅंकेसंदर्भातील आहे.

  • दिलेल्या यादीमधून तुम्हाला ज्या बँकेकडून कर्ज घ्यावयाचे आहे त्या बँकेचे नाव निवडा
  • जी बँक तुम्ही निवडलेली आहे त्या बँकेची शाखा निवडा
  • आणि सर्वात शेवटी दिसत असलेल्या Submit या निळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करा.

बँकेच्या पिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे.

  • आधार कार्ड छायांकित प्रत.
  • पॅन कार्ड छायांकित प्रत.
  • मतदान कार्ड छायांकित प्रत.
  • सातबारा व एकूण जमिनीचा दाखला ( नमुना नं ८ अ).
  • पिक पेरा प्रमाणपत्र.
  • जमिनीची चतु:सीमा.
  • सोसायटी बेबाकी प्रमाणपत्र.
  • १०० रुपयाच्या बाँडवर बेबाकी घोषणापत्र.
  • १०० रु. दोन बाँडपेपर.
  • दोन पासपोर्ट साईज फोटो.
  • माहिती अर्ज.
  • पासबुक छायांकित प्रत.
  • फेरफार नक्कल,

शासकीय योजनांसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज कसे करावेत हे जाणून घेण्यासाठी डिजिटल डीजी युट्युब भेट द्या.

वरीलप्रमाणे पिक कर्ज ऑनलाईन मागणी अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला कर्ज देण्यासाठी उपलब्ध असलेल्या बँकेला करू शकता. जर तुम्हाला बँकेकडून कागदपत्रे संदेश आला तर कोणकोणती कागदपत्रे सादर करावी लागतात या संदर्भात आपण या ठिकाणी सविस्तर माहिती घेतलेली आहे. शेती योजना संबधी विविध शासकीय योजनाचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज कसे करावेत या माहितीसाठी डिजिटल डीजी या युट्युब चॅनलवर मोफत माहिती दिली जाते, डिजिटल डीजी या युट्युब चॅनलला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

विविध शासकीय योजनांचे लेख वाचा.

शेती संबधी शासनाच्या विविध योजना सुरु असतात मात्र केवळ या योजनांची पुरेपूर माहिती नसल्यामुळे शेतकरी बांधव अशा योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहू शकतात. डिजिटल डीजी वेबसाईट व डिजिटल डीजी युट्युब चॅनलवर सरकारी अनुदान योजना, शेतकरी योजना, महाडीबीटी शेतकरी योजना 2021 त्याच प्रमाणे महाराष्ट्र कृषी विभाग शेतकरी योजना या संदर्भातील माहिती मोफत प्रसारित केली जातेत्यामुळे आमच्याशी जोडलेले राहा.फेसबुक ग्रुप लिंक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *