शेळी पालन प्रशिक्षण ऑनलाईन अर्ज सादर करा तुमच्या मोबाईलवरून

शेळी पालन प्रशिक्षण ऑनलाईन अर्ज सादर करा तुमच्या मोबाईलवरून

शेळी पालन प्रशिक्षण ऑनलाईन अर्ज तुमच्या मोबाईलवरून तुम्ही सादर करू शकता. तुम्ही जर शेतकरी असाल आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन प्रशिक्षण घेऊ इच्छित असाल तर हि माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरणार आहे. ऑनलाइन शेळीपालन प्रशिक्षणासाठी अर्ज सुरु झालेले आहेत. हे शेळीपालन प्रशिक्षण ६ दिवसाचे असून प्रशिक्षण यशस्वी करणाऱ्या प्रशिक्षार्थींना प्रमाणपत्र मिळणार आहे. ( शेळी पालन प्रशिक्षणाचा ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा. )

शेळी पालन प्रशिक्षण ऑनलाईन प्रमाणपत्राचा उपयोग

ऑनलाइन शेळीपालन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थीला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्रावर NSDC व स्कील इंडियाचा लोगो असणार आहे. शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी जर तुम्हाला बँकेतर्फे कर्ज हवे असेल तर तुम्हाला शेळीपालन प्रशिक्षण प्रमाणपत्राचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो. शेळीपालन प्रशिक्षण प्रमाण पत्र असल्यास बँकेतर्फे कर्ज मिळण्यास सोपे जाते.

शेळी पालन प्रशिक्षण ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत.

हे शेळीपालन प्रशिक्षण ऑनलाईन होणार आहे त्यामुळे अगदी मोबाईलवर तुम्ही हे प्रशिक्षण पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला एक ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. तो अर्ज खालीलप्रमाणे सादर करा.

WhatsApp Group

शेळी पालन प्रशिक्षण
 • मोबाईलमध्ये इंटरनेट सुविधा सक्रीय असल्याची खात्री करा.
 • तुमच्या मोबाईलमधील ब्राउजर ओपन करा.
 • सर्च बारमध्ये टाईप digitaldg.in आणि सर्च करा.
 • तुमच्या मोबाईलवर digitaldg.in हि वेबसाईट ओपन होईल.
 • या ठिकाणी दिसत असलेल्या तीन आडव्या रेषा म्हणजेज तीन डॉटसवर टच करा.
 • सरकारी योजना या पर्यायाला टच करा.
 • पेजला थोडे खाली स्क्रोल करा.
 • या ठिकाणी goat farming training ऑनलाईन शेळी पालन प्रशिक्षण असा करा ऑनलाईन अर्ज अशी लिंक दिसेल त्यावर टच करा.
 • या लेखामध्ये तुम्हाला शेळीपालन प्रशिक्षण संबधित जाहिरात, शेळी पालन, शेळी पालन प्रशिक्षण ऑनलाईन अर्ज लिंक व प्रशिक्षण प्रमाणपत्र नमुना हि सर्व माहिती बघावयास मिळेल.
 • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ‘ ऑनलाईन अर्ज सादर करा असे एक बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
 • जेंव्हा तुम्ही या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या मोबाईलवर एक गुगल फॉर्म ओपन होईल. त्या फॉर्म मध्ये विचारलेली माहिती तुम्हाला भरावयाची आहे.

शेळी पालन प्रशिक्षण संदर्भातील अधिक माहिती.

शेळीपालन प्रशिक्षणासाठी गुगल फॉर्म भरा.

 • तुमचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव टाईप करा.
 • तुमच्या आईचे नाव टाईप करा.
 • तुमच्या गावाचे नाव, पोस्ट, तालुका, जिल्हा आणिज पिनकोड हि माहिती भरा.
 • व्हॉट्सॲप मोबाईल नंबर आणि संपर्क नंबर अचूक टाका कारण यावर तुमचे प्रमाणपत्र पाठविले जाणार आहे.
 • जन्मदिनांक व इमेल विषयी माहिती टाका
 • या पूर्वी शेळीपालन प्रशिक्षण घेतले आहे काय ? असेल तर होय या पर्यायाला टच करा किंवा नसेल तर नाही या पर्यायाला टच करा.
 • प्रशिक्षण घेण्याचा उद्देश दिलेल्या पर्यायामधून निवडा. १) शेळीपालन व्यवसायाची माहिती मिळविणे २) शेळी पालन व्यवसाय यशस्वीपणे सुरु करणे ३) शेळी पालन व्यवसायासाठी कर्ज मिळविणे.

शेळी पालन गट वाटप योजना यादी.

प्रशिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

 • आधार कार्डाच्या समोरील बाजूचे छायाचित्र अपलोड करा.
 • आधार कार्डाच्या मागील बाजूचे छायाचित्र अपलोड करा.
 • पेमेंट केल्याचा फोन पे स्क्रीन शॉर्ट सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे.

शेळी पालन कर्ज योजना

प्रशिक्षण संदर्भातील इतर माहिती.

हे प्रशिक्षण युवा ट्रस्ट संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आहे. प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी हा दिनांक ०२ ते २४ ऑक्टोबर २०२१ असा आहे. हे ऑनलाईन प्रशिक्षण २५ ते ३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुरु असणार आहे. या प्रशिक्षणाची फीस ६०० रुपये असून प्रशिक्षण यशस्वी पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र लाभार्थींना ऑनलाईन पाठविले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी संस्थेच्या अधिकारी सौ. संपदा नळणीकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे. संपर्क नंबर आहे ९०७५५६२४६६ व ९०६७०८४०५९.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *