शेतकऱ्यांनो गरिबीतच नाही मारायचं फक्त अशा शेतीचे नियोजन करा.

शेतकऱ्यांनो गरिबीतच नाही मारायचं फक्त अशा शेतीचे नियोजन करा.

शेतकऱ्यांनो गरिबीतच नाही मारायचं. आणखी किती वेळ गरीबीचे चटके सोसणार आहात. शेतीमध्ये फक्त कष्ट करायचे आणि आयुष्याच्या शेवटी मोतीबिंदूचे ऑपरेशन करून मारायचे, एवढेच आपले ध्येय आहे का? शेतकरी बंधुंनो थोडा विचार करा. कुठे  आपल्या मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी पालव्यावर दीड ज्वारीची भाकरी बांधून दुसऱ्याच्या शेतात २०० रुपये रोजाना जाणारी आपली आई आणि कुठे सकाळच्या नाष्ट्यावर हजारो रुपये खर्च करणारे हे पांढरपेशी लोक.

मोठा विचार करा व तो अमलात आणा शेतकऱ्यांनो गरिबीतच नाही मारायचं

तुमच्याकडे दोन एकर जमीन असेल तर पहिल्या वर्षी तुमचे ध्येय त्यामध्ये दोन लाखाचे उत्पन्न काढण्याचे असावे. प्रत्येक वर्षी हे ध्येय वाढलेले असावे. एका एकरमध्ये मला जर १ लाख रुपये उत्पन मिळत असेल तर याच क्षेत्रामध्ये मला दोन लाख उत्पन कसे मिळविता येईल याचा विचार केला गेला पाहिजे. मग एका एकरमध्ये कपाशीची लागवड करून तुम्हाला एक लाख मिळत असतील तर त्याच क्षेत्रामध्ये दोन लाख मिळविण्यासाठी तुमच्या मनामध्ये कदाचित रोपवाटिका लागवड करण्याचा विचार येवू शकतो किंवा तुती लागवड करण्याचा विचार येवू शकतो किंवा यापेक्षा हटके मधुमक्षी पालन करण्याचा विचार येवू शकतो. म्हणजेच तुमच्या मनात वेगवेगळ्या कल्पना येवू शकतात आणि या कल्पना अमलात आणल्यास याचे सकारात्मक परिणाम देखील मिळू शकतात.

नवनवीन पिक पद्धतींची माहिती मिळवा. ( शेतकऱ्यांनो गरिबीतच नाही मारायचं )

पारंपारिक पिकांमध्ये तोटा येत असेल तर पिक पद्धती बदला. त्यासाठी नवनवीन पिकांची महिती घेत चला. शेती पूरक व्यवसायाची माहिती मिळवा त्यासाठी ॲग्रोवन किंवा ज्या वृत्तपत्रामध्ये, साप्ताहमध्ये किंवा मासिकांमध्ये शेतीविषयक दिलेली माहिती वाचत चला. Whatsapp Group वर किंवा इतर समाजमाध्यमांवर शेतीविषयक माहिती दिली असेल आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचा संपर्क दिला असेल तर नक्की त्याला फोन करा आणि त्या संबधी माहिती विचारा.

सोशल मिडीयावर सक्रीय राहा.

गाव असो किंवा शहर प्रत्येकाकडे इंटरनेट सुविधा असलेला मोबाईल असतोच. यामध्ये फेसबुक आणि व्हॉट्सॲप तर असतेच असते. फेसबुकवर जर तुमचे खाते असेल तर या ठिकाणी विविध फेसबुक शेतकरी ग्रुप शोधा त्यामध्ये सामील व्हा. शेतकरी व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये सामील व्हा आणि जे शेतकरी खात्रीलायक माहिती टाकत असेल तर त्यांचाशी संपर्क करा. शेतीविषयक युट्युब चॅनल बघा. त्यावरील शेतीविषयक व्हिडीओ पहा आणि नवीन माहिती मिळवा.

यशस्वी शेतकऱ्यांच्या संपर्कात राहा त्यांचे अनुभव जाणून घ्या.

ज्या शेतकऱ्याने यशस्वी शेती केली आहे किंवा ज्यां शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात पिक पद्धत बदलली आहे अशा शेतकऱ्यांशी संपर्क करा त्यांचे विचार जाऊन घ्या, त्यांनी कशा पद्धतीने पिक पद्धतीचा अवलंब केला आहे, कोणत्या मार्केटला त्यांना चांगला भाव मिळतो आहे. यामध्ये धोका किती प्रमाणात असू शकतो हि आणि अशी इतर महत्वाची माहिती मिळवा. जेणे करून तुम्हाला या माहितीचा फायदा होऊ शकतो.

शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्यास घाबरू नका.

आपल्या समाजामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये जर एखादा शेतकरी शेतीमध्ये नवीन काहीतरी प्रयोग करत असेल तर त्याला नवे ठेवली जातात याला काही ठिकाणी अपवादही असू शकतो. मात्र नवीन काहीतरी करायला गेले कि सर्वात अगोदर आपल्या जवळच्या व्यक्तीकडूनच त्यावर टीका केली जाते. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या शेतीमध्ये काही नवीन प्रयोग करत असाल तर अशा टीकांनां घाबरू नका किंवा जो कोणी शेतकरी त्याच्या शेतीमध्ये नवीन काहीतरी करण्याचे धाडस करत असेल तर त्या शेतकऱ्यांवर टीका करणाऱ्या लोकांमध्ये सामील होऊ नका. त्याएवजी नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांकडे जा. त्याला त्याविषयी माहिती विचारा कदाचित त्यामधून तुम्हाला देखील चांगली प्रेरणा मिळू शकेल.

फळबाग शेतीमध्ये लाखोंचे उत्पन्न शक्य आहे.

पारंपारिक पिक पद्धतीला तुम्ही कांटाळले असाल किंवा असे म्हणणे योग्य राहील कि पारंपारिक पिकामध्ये तुम्हाला नुकसान होत असेल तर तुम्ही फळबाग लागवडीकडे देखील वळू शकता. जसे कि सीताफळ फळबाग, आवळा फळबाग, पेरू इत्यादी अनेक फळबागा अशा आहेत कि अत्यंत कमीज क्षेत्रामध्ये कमी खर्चात प्रचंड प्रमाणत तुम्हाला उत्पादन मिळवून देवू शकतात.

शेतीपूरक व्यवसाय केल्यास अधिक फायदा.

शेती बरोबर शेतीला पूरक व्यवसाय देखील तुम्ही करू शकता. जसे कि दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन इत्यादी व्यवसाय करण्याचा देखील प्रयत्न करा कारण ज्यावेळी तुमची शेती तोट्यात जाईल त्यावेळी हे शेतीपूरक व्यवसाय तुम्हाला सावरायला मदत करतील. ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणत चालणारा व्यवसाय म्हणजे शेळी पालन व्यवसाय होय. हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला बँकेकडून कर्ज देखील मिळू शकते. शेळी पालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी शेळीपालन प्रशिक्षण घेणे गरजेचे असते.

शेतीला जोडधंदा करण्यासाठी प्रशिक्षण घ्या आणि माहिती मिळवा.

कोरोना महामारीमुळे अनेक संस्था सध्या दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन इत्यादी व्यवसायाचे व्यवसायांचे ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करत असतात. पूर्वी हे प्रशिक्षण घेण्यासाठी तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत असे आता तुम्ही हे प्रशिक्षण तुमच्या मोबाईलवर अगदी घरी बसून देखील पूर्ण करू शकता. उदारणार्थ तुम्हाला जर शेळी पालन व्यवसाय करायचा असेल करायचा असेल तर लगेच ऑनलाईन शेळीपालन प्रशिक्षण घ्या. अशाच प्रकारे दुग्धव्यवसाय किंवा कुक्कुटपालन योजनेचे प्रशिक्षण घेवून त्या व्यवसायाचे चांगले ज्ञान मिळवा आणि शेतीला पूरक व्यवसाय सुरु करा. यामधून देखील तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.

अन्न प्रक्रिया करून मालाचे मूल्यवर्धन करा.

तुमच्या घरातील लहान मुलाने कधीतरी तुम्हाला चिप्स मागितले असतील आणि हे चिप्सचे पाकीट अगदी सहज तुम्ही तुमच्या गावातील कोणत्याही किराणा दुकानामधून खरेदी करून ते मुलाला दिले असेल. तुही बघितले असेल कि पाच रुपयामध्ये किती चिप्स त्या पाकीटामध्ये असतात.

  • एका चिप्सच्या पाकिटाचे पॅकिंगसहित वजन अंदाजे ०.१७ कि. ग्रॅ.
  • चिप्सच्या एका पाकिटाची किमंत अंदाजे ५ ते १० रुपये
  • म्हणजेच एक किलो आलूमध्ये जवळपास ६ पाकीट बनू शकतात ज्याची किंमत अंदाजे ५० ते ६० रुपये असू शकते.

अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी शासनाकडून मिळते १० लाखापर्यंत अनुदान.

एकीकडे तुमच्या शेतातील पिकविलेला आलू भाव नसल्यामुळे पडून आहे तर दुसरीकडे त्याच आलूवर प्रक्रीयाकरून, त्याचे मूल्यवर्धन करून त्यावर नफा कमविला जात आहे. शेतकरी बंधूंनी देखील शेतातील उत्पादित मालाचे मूल्यवर्धन करून नफा मिळवायला शिकले पाहिजे. अन्न प्रक्रिया उद्योग विभागामार्फत यासाठी १० लाखापर्यंत कर्ज देखील मिळते. अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी १० लाखापर्यंत कर्ज मिळविण्यासाठी असा करा ऑनलाई अर्ज.

विविध शासकीय योजनांचा लाभ घ्या.

शेती पूरक व्यवसाय करण्यासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ घेवून तुम्ही आर्थिक मदत मिळवू शकता. शासकीय योजनांची माहिती मिळविण्यासाठी विविध वृत्तपत्रे वाचत राहा. तालुक्याच्या पशुसंवर्धन विभागाला भेट द्या. पशु संवर्धन विभागाच्या वेबसाईटवर देखील विविध योजनांची माहिती असते. पशु संवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

यश मिळविण्यासाठी सकारात्मक विचार करा.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे उच्च विचार ठेवा. माझ्याकडून काही होणार नाही. मला हे जमणार नाही हि मानसिकता बदल तरच तुम्ही बदल करू शकता. शेतीमध्ये विविध प्रयोग करण्याचे धोके देखील पत्करावे लागतात कारण जो पर्यंत तुम्ही धोका पत्करणार नाही तो पर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे The person who risks nothing, does nothing, has nothing, is nothing, and becomes nothing. त्यामुळे शेती यशस्वी करायची असेल तर बदल स्वीकारा आणि आमची पिढी जरी गीरीबीमध्ये गेली तरी आम्ही मात्र गरीब म्हणून मारणार नाही हि खूनगाठ मनाशी बांधा आणि कामाला लागा.

शेतकऱ्यांनो गरिबीतच नाही मारायचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *