PM kisan Ekyc सुरु झाली अशी करा ekyc तुमच्या मोबाईलवरून

PM kisan Ekyc सुरु झाली अशी करा ekyc तुमच्या मोबाईलवरून

Ekyc सुरु झाली अशी करा pm kisan samman nidhi ekyc नाहीतर मिळणार नाही २००० हफ्ता

pm kisan samman nidhi म्हणजेच प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकरी बांधवाना दरवर्षी ६००० एवढे मानधन मिळते. यामुळे शेतकरी बांधवाना आर्थिक सहाय्य होते. या संदर्भातील व्हिडीओची लिंक या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेली आहे त्यावर क्लिक करून व्हिडीओ पहा आणि त्याप्रमाणे तुमची ईकेवायसी करून घ्या.

shetkari whatsapp group link
shetkari whatsapp group link

अनेक शेतकऱ्यांना pm kisan samman nidhi चा २००० रुपयांचा हफ्ता रेग्युलर मिळत आलेला आहे. मात्र यापुढे तुम्हाला हे हफ्ते पुढे देखील सुरु राहावेत यासाठी pm kisan ekyc करावी लागणार आहे. तुम्ही जर तुमची ekyc केली नाही तर तुम्हाला यापुढे pm kisan samman nidhi चा २००० रुपयांचा हफ्ता मिळण्यास अडचण येवू शकते.

Telegram Group Link

PM kisan Ekyc सुरु खालील दोन पद्धतीने करू शकता तुमची ekyc

बऱ्याच दिवसापासून अनेक शेतकरी बांधव pm kisan ekyc कधी सुरु होईल यासंदर्भात वाट बघत होते. मध्यंतरी https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर तांत्रिक अडचणीमुळे हि ekyc होण्यास अडचणी येत होत्या त्या आता दूर झालेल्या आहेत.

तुम्हाला जर pm kisan samman nidhi चा २००० रुपयांचा हफ्ता निरंतर सुरु ठेवायचा असेल तर लगेच खालील पद्धतींचा अवलंब करून तुमची ekyc करून घ्या. pm kisan ekyc खालील दोन पद्धतीने तुम्ही करू शकता.

  • सीएससी सेंटरवर जावून बायोमेट्रिक द्वारे
  • स्वतः आधार otp द्वारे.

हा लेख पण वाचा पीएम किसान सम्मान निधीचे २००० रुपयांचा हफ्ता मिळविण्यासाठी अशी करा नोंदणी

तुम्हाला माहित आहे का किPM kisan Ekyc आधार otp द्वारे शेतकरी स्वतः करू शकतात.

PM kisan Ekyc सुरु
pm kisan ekyc

pm kisan ekyc स्वतः करायची असल्यास शेतकरी स्वतः देखील करू शकतात. त्यासाठी ज्या वायाक्तींची ekyc करायची आहे त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. मोबाईल नंबर जर आधार नंबरला लिंक नसेल तर शेतकरी त्यांची kyc करू शकणार नाहीत. पण जर मोबाईल नंबर आधारला लिंक असेल तर अशावेळी शेतकरी त्यांची pm kisan ekyc स्वतः करू शकणार आहेत.

या ठिकाणी आपण ईकेवायसी करण्याच्या दोन्ही पद्धती समजून घेणार आहोत.

पहिली पद्धत स्वतः ईकेवायसी करणे

WhatsApp Group Link

स्वतः ईकेवायसी करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

  • https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर जा.
  • मोबाईल आणि कॉम्प्युटरवर जरी वेगवेगळे इंटरफेस (वेबसाईटचा आकार) दिसत असले तरी प्रोसेस मात्र सारखीच आहे.
  • farmer corner या पर्यायाच्या खाली eKYC असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • आधार otp करण्यास या ठिकाणी तुम्हाला सुरुवात करायची आहे.
  • शेतकऱ्याने त्यांच्या आधार नंबर दिलेल्या चौकटीत टाकून सर्च करायचे आहे.
  • त्यानंतर आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकावा.
  • otp या बटनावर क्लिक करताच आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक otp येईल तो Enter mobile otp या पर्यायाखाली दिलेल्या चौकटीमध्ये टाका.
  • त्यानंतर तुमच्या आधारवर एक otp येईल तो देखील दिलेल्या चौकटत टाका आणि सबमिट या बटनावर क्लिक करा.
  • जसे हि तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या मोबाईलच्या किंवा कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर Ekyc is successfully submited असा संदेश तुम्हाला दिसेल याचा अर्थ तुमची pm kisan Ekyc यशस्वीपणे सादर झालेली आहे.

हि झाली आधार कार्डद्वारे pm kisan Ekyc करण्याची पद्धत. तुम्हाला अजूनही हि पद्धत समजली नसेल तर खालील व्हिडीओ लिंकवर क्लिक करून व्हिडीओ पहा आणि त्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा.

pm kisan Ekyc करण्याची दुसरी पद्धत म्हणजे csc सेंटरवर जावून बायोमेट्रिकद्वारे ईकेवायसी करणे.

तुमच्याकडे सीएससी सेंटर असेल तर तुम्ही विविध शेतकऱ्यांची ईकेवायसी करू शकता. ज्या पद्धतीने आधार otp द्वारे ई केवाईसी करण्याची पद्धत वर सांगितल्याप्रमाणे दाखविलेली आहे.

csc आयडीवरून ईकेवायसी करण्याचे काही वेगळे पर्याय असतात ते खालील दिलेल्या पद्धतीने आपण समजावून घेवूयात. पुढे प्रोसेस करण्याआधी एक बाब या ठीकानीज लक्षात घ्या कि मंत्रा मशीनवर ekyc होत नसेल तर जुने मंत्रा मशीनचे ड्रायव्हर्स uninstall करून install करा. त्याच प्रमाणे तुमच्या कॉम्प्युटरमधील टेम्पररी फिल्स डिलीट करून घ्या.

  • pmkisan.gov.in या वेबसाईटच्या नेव्हिगेशन बारवर दिसत असलेल्या csc login या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा csc login id, पासवर्ड व कॅपचा कोड टाकून लॉगीन करा.
  • नेव्हिगेशन बारवर दिसत असलेल्या Biometric Aadhar Authentication या पर्यायावर क्लिक करा.
  • आधार क्रमांक टाका, मोबाईल नंबर टाका otp टाका.
  • otp टाकल्यानंतर capture for Ekyc असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • शेतकऱ्यांच्या बोटांचे मंत्रा मशीनवर इम्प्रेशन घ्या.
  • submit या बटनावर क्लिक करा त्यानंतर Make payment असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • ५.३४ पैसे एवढे पेमेंट करण्यासाठी तुमच्या csc वालेट चा पासवर्ड टाका आणि पेमेंट करा.
  • पेमेंट यशस्वी केल्यानंतर पावती मिळेल त्याची प्रिंट काढून संबधित शेतकर्याकडे द्या.

तर मित्रांनो अशा पद्धतीने pm किसान Ekyc दोन पद्धतीने कशी केली जाते या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेतलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *