कुक्कुटपालन शेळी पालन व इतर योजनांसाठी असा करा ऑनलाईन अर्ज

कुक्कुटपालन शेळी पालन व इतर योजनांसाठी असा करा ऑनलाईन अर्ज

कुक्कुटपालन शेळी पालन व इतर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात सखोल माहिती जाणून घेवूयात.दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजी NLM म्हणजेच National Livestock mission एक शासन निर्णय म्हणजेच जी आर आला होता. या जी आर नुसार कुक्कुटपालन, शेळी मेंढी पालन व इतर योजनांसाठी मंजुरी देण्यात आली होती. या विविध योजनांसंदर्भात या जी आर मध्ये तपशीलवारपणे माहिती देण्यात आली होती.

योजनेचा जी आर बघण्यासाठी येथे क्लिक करा.

shetkari whatsapp group
shetkari whatsapp group

तुम्हाला जर कुक्कुटपालन शेळीपालन व्यवसाय करायचा असेल तर किंवा शेळी पालन व्यवसाय सुरु करायचा असेल आणि यासाठी अनुदान हवे असेल तर लगेच ऑनलाईन अर्ज भरून द्या आणि या योजनेचा लाभ घ्या. या योज्नेसाठीज ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

हा लेख पण वाचा पीएम किसान सन्मान निधी मिळविण्यासाठी असे करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन

कुक्कुटपालन शेळी पालन योजनेसाठी खालील तीन उपभियान राबविले जाणार आहेत.

  • पशुधन व कुक्कुट वंश सुधारणा उपभियान.
  • पशुखाद्य व वैरणविकास उपभियान.
  • नाविन्यपूर्ण संशोधन व विस्तार उपभियान.

वरीलप्रमाणे तीन उपअभियान या NLM म्हणजेच National Livestock mission अभियान अंतर्गत राबविले जाणार आहे. यासाठी तुम्हाला https://www.nlm.udyamimitra.in/ या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

पुढील लेख पण वाचा अशी करा ईकेवायसी

कुक्कुटपालन शेळी पालन असा करा ऑनलाईन अर्ज.

कुक्कुटपालन शेळी पालन
  • https://www.nlm.udyamimitra.in/ या वेबसाइटवर जा किंवा येथे क्लिक करा.
  • Welcome to NLM असा इंटरफेस तुम्हाला दिसेल. Login as Entrepreneur व Login as Government असे दोन पर्याय या ठिकाणी दिसेल.
  • Login as Entrepreneur या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाका.
  • तुम्ही टाकलेल्या मोबाईलनंबरवर एक ओटीपी येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका.
  • ओटीपी टाकल्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात होईल.

वरील पद्धतीने हा ऑनलाईन अर्ज तुम्हाला अचूक सादर करायचा आहे. अर्जामध्ये खलील ठळक बाबींचा समावेश असेल ज्याबद्दल माहिती तुम्हाला टाकायची आहे.

आमच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक

कुक्कुटपालन शेळी पालन व इतर योजनांसाठी खालील पाच टप्प्यामध्ये करावा लागणार

  • Applicant details अर्जदाराविषयी माहिती.
  • Project details प्रकल्पाविषयी माहिती.
  • Bank account details. बँक खात्याचे तपशील.
  • upload documents. कागदपत्रे अपलोड करणे.
  • submit application अर्ज सादर करणे.

वरील पाच टप्प्यामध्ये हा अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे. अजूनही या ऑनलाईन अर्जाविषयी तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर खालील pdf download करा.

पशुसंवर्धन विभागाची अधिकृत वेबसाईट

या pdf मध्ये ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील अगदी तपशीलवारपणे माहिती दिलेली आहे. खालील बटनावर क्लिक करून हि pdf file तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या. जी प्रोसेस यामध्ये सांगितलेली आहे त्याप्रमाणे कृती करा.

योजनेसाठी पात्रता

National Livestock mission योजनेचा लाभ खालील घटकांना घेता येतो.

  • वैयक्तिक
  • बचत गट.
  • शेतकरी उत्पादक कंपनी.
  • सहकारी शेतकरी संस्था.
  • शेतकरी गट.
  • सेक्शन ८ नुसार स्थापन झालेली कंपनी.
  • सहकारी दुध संस्था.
  • खाजगी संस्था.
  • उद्योजक.
  • व इतर.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे.

  • Detail project Report. (DPR)
  • पॅन कार्ड
  • रहिवासी पत्ता.
  • KYC कागदपत्रे.
  • आधार कार्ड.
  • रद्द झालेला धनादेश.
  • फोटो.

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कुक्कुटपालन शेळी मेंढी पालन व इतर योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. हि माहिती आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचविण्यासाठी whatsapp group किंवा फेसबुक द्वारे शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *