ekyc आता मोबाईलवर शक्य सूचना आली अशी करा इकेवायसी

ekyc आता मोबाईलवर शक्य सूचना आली अशी करा इकेवायसी

ekyc आता मोबाईलवर शक्य. ekyc करण्याच्या पद्धतीमध्ये काही दिवसापूर्वी बदल करण्यात आला होता. ekyc केवळ बायोमेट्रिक द्वारेच केली जात होती. आता या पद्धतीमध्ये बदल करण्यात आला आहे. यापुढे ekyc otp च्याद्वारे देखील केली जाणार आहे.

म्हणजेच तुम्ही आता तुमच्या मोबाईलवरून देखील pm kisan ची ekyc करू शकता अगदी मोबाईलवरून ते देखील निशुल्क.

मागील काही दिवसापूर्वी otp द्वारे ekyc करणे बंद झाले होते आता हि सुविधा सुरु झाली असल्याची सूचना शासनाच्या https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.

आधार otp द्वारे ekyc आता मोबाईलवर शक्य

ekyc आता मोबाईलवरून शक्य
ekyc आता मोबाईलवरून शक्य

हि सूचना पुढील प्रमाणे आहे. eKYC is MANDATORY for PMKISAN Registered Farmers. OTP Based eKYC is available on PMKISAN Portal. म्हणजेच आता मोबाईलवरून देखील ekyc करणे शक्य होणार आहे.

मोबाईलचा उपयोग करून pm किसान ekyc कशी करतात हे जाणून घेण्यासाठी या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हिडीओ लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून व्हिडीओ बघा आणि त्या प्रमाणे कृती करा जेणे करून तुम्हाला तुमची ekyc तुमच्या मोबाईलवरून करता येईल आणि pm किसान निधी योजनेचा निरंतर लाभ घेता येईल.

पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेण्यासाठी अशी करा नोंदणी

ekyc आता मोबाईलवर शक्य अत्यंत सोप्या पद्धतीने

पीएम किसान ekyc करण्यासाठी शेवटची तारीख ३१ मे २०२२ आहे. या तारखेपूर्वी जर तुम्ही तुमची ekyc केली नाही तर तुम्हाला pm kisan samman nidhi चे वार्षिक ६००० रुपये मिळणार नाहीत.

अनेक शेतकऱ्यांनी ekyc करण्यासाठी सीएससी सेंटरवर गर्दी केली होती. मध्यंतरी या वेबसाईटमध्ये काही तांत्रिक अडचणी देखील उद्भवत होत्या त्यामुळे ekyc करणे अवघड जात होते.

pm kisan ekyc करण्याच्या दोन पद्धती असतात. पहिली पद्धत म्हणजे बायोमेट्रिक आधार पडताळणी व दुसरी पद्धत म्हणजे otp आधार पडताळणी.

खालील व्हिडीओ पहा आणि त्याप्रमाणे कृती करा

बऱ्याच शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन असतात अशावेळी ज्या शेतकऱ्यांच्या आधारला मोबाईलनंबर लिंक केलेला आहे ते शेतकरी अगदी त्यांच्या मोबाईलचा उपयोग करून ekyc करू शकतात.

परंतु ज्यांच्या मोबाईलला आधार नंबर लिंक केलेला नाहीत त्यांना मंत्र जवळच्या csc सेंटरवर जावून बायोमेट्रिक मशीनचा उपयोग करून आधार पडताळणी करावी लागते आणि त्यानंतरच त्यांची ekyc पूर्ण होऊ शकते.

मोबाईलवर ekyc करणे अत्यंत सोपी आहे अगदी काही मिनिटामध्ये शेतकरी त्यांची ekyc करू शकतात आणि त्यासाठी कुठलेली शुल्क लागत नाही. अगदी निशुल्कपणे मोबाईलवरून ekyc केली जावू शकते.

मोबाईलचा उपयोग करून ekyc कशी करावी हे जाणून घेण्यासाठी खालील बटनावर क्लिक करून व्हिडीओ पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *