फळझाडे व भाजीपाला लागवड योजना संदर्भात माहिती जाणून घेवूयात जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. शेतकरी बांधवांसाठी विविध योजना सुरु असतात या संदर्भात आपण वेळोवेळी आपल्या डिजिटल डीजी वेबसाईटवर माहिती घेत आलेलो आहोत.
घराच्या परिसरामध्ये म्हणजेच परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड करण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. या योजनेच्या प्रभावी अमलबजावणीसाठी निधी वितरणबाबत नुकताच शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. याच संदर्भात आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
पुढील योजना पण फायद्याची आहे सौर उर्जा कुंपण योजना
फळझाडे व भाजीपाला लागवड योजनेसाठी निधी वितरणाचा शासन निर्णय
हि योजना २००३-०४ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ३३ लक्ष निधीस मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरनिर्गमित करण्यात आला आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या अधिवासी विकास कार्याल किंवा संबधित कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड असे या योजनेचे नाव आहे. हि योजना फक्त आदिवासी कुटुंबासाठी राबविली जाते.
पुढील योजना देखील बघा डीझेल पंप अनुदानासाठी असा करा ऑनलाईन अर्ज
फळझाडे व भाजीपाला लागवड योजना केवळ १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी
खालील १४ जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबाना योजनेचा लाभ मिळणार आहे.
- ठाणे.
- पालघर.
- पुणे.
- नाशिक.
- धुळे.
- नंदुरबार.
- जळगाव.
- अहमदनगर.
- नांदेड.
- यवतमाळ.
- गडचीरोली.
- चंद्रपूर.
- अमरावती.
- गोंदिया.
आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत राज्यातील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत आदिवासी कुटुंबाना पौष्टिक आहार पुरविण्यासाठी हि योजना राबविली जात आहे.
आदिवासी बांधवाच्या विकासासाठी हि योजना राबविली जाते. जास्तीत जास्त आदिवासी बांधवानी या योजनेचा लाभ घेवून आपली प्रगती साधून घ्यावी.
योजनेच्या अधिक माहितीसाठी व अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
योजनेविषयी अधिक माहिती जाणून घ्या.
हि योजना कशा पद्धतीने राबविली जाते, योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या विभागास भेट द्यावी अनुदान किती मिळेल कसे मिळेल हि आणि इतर माहितीसाठी खालील बटनावर क्लिक करा आणि या फळबाग व भाजीपाला लागवड योजनेची माहिती जाणून घ्या.
या योजना अंतर्गत लाभार्थीला रोपांचे वाटप केले जाते. लाभार्थीना रोपांची लागवड, जोपासना, फळे काढणी व भाजीपाला यांचे पदार्थ तयार करणे इत्यादीसाठी ग्रामस्तरावर प्रशिक्षण देण्यात येते.
योजना अंतर्गत खालील फळझाडे किंवा भाजीपाला पिके लाभार्थीला दिले जातात.
- चिकू.
- आंबा.
- पेरू.
- दोडका.
- गवार.
- मेथी.
- पालक.
- दुधी भोपळा.
इतर भाजीपाला जसे आळू वांगी इत्यादी स्थानिक गरजेनुसार आवश्यक मागणी असलेले फळझाड किंवा कलमांचा पुरवठा करण्यात येतो.