महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना अंतर्गत महिला बचत गट कर्ज मिळू शकणार आहे. जे कर्ज महिला बचत गटांना मिळणार आहे त्यावरील १२ टक्के व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा महामंडळामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
राज्यातील इतर मागास प्रवर्गातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे आणि याद्वारे अशा महिलांना सक्षम करणे हा शासनाचा हेतू आहे.
शेतकरी योजना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जॉईन व्हा विविध योजनांची माहिती तुमच्या व्हॉट्सॲपवर मोफत पाठविली जाईल.
महिला बचत गट कर्ज योजना संदर्भातील माहिती जाणून घ्या.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना राबविली जात आहे.
ग्रामीण भागातील महिलांना सोप्या पद्धतीने पैसा उपलब्ध व्हावा आणि त्यातून या महिलांनी त्यांचा उद्योग व्यवसाय उभारून सक्षम होण्यासाठी गावावामध्ये बचत गटांची निर्मिती करण्यात आलेली आहे.
महिला बचत गट कर्ज योजना मध्ये महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना संदर्भात जाणून घ्या
अशा बचत गटांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो. अशीच एक योजना म्हणजेच महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना होय. या योजना संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना अंतर्गत इतर मागास प्रवर्गातील ज्या गरीब महिला असतील. होतकरू, परितक्त्या महिला असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ देऊन सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
महिला बचत गटांना महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना अंतर्गत बँका मार्फत ५ ते १० लाख रुपयापर्यंत करू मिळू शकते.
योजनेचे स्वरूप जाणून घ्या.
- महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी महिला बचत गटामध्ये कमीत कमी ५० टक्के महिला इतर मागास प्रवर्गातील असायला हव्यात.
- पहिल्या टप्प्यामध्ये अशा बचत गटांना बँकेकडून ५ लाखापर्यंत कर्ज घेण्यास मंजुरी देण्यात येईल.
- बचत गटाने पहिल्या टप्प्यातील कर्ज व्यवस्थित परतफेड केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी १० लाख रुपयांचे कर्ज घेण्यास असा गट पात्र ठरेल.
- बँकेकडून जे कर्ज मंजूर होईल त्या कर्जाचे कमाल १२ टक्के व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा OBC महामंडळामार्फत अदा करण्यात येईल.
अर्जासोबत सादर करायची कागदपत्रे.
- सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला.
- वयाचा पुरावा.
- रहिवासी दाखला.
- बचत गटाचे बँक पासबुक ( झेरॉक्स )
- CMRC कडून प्रमाणित कौटुंबिक उत्पन्नाबाबतचे प्रमाणपत्र.
- अर्जदार महिलेने कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- महिलेचे वय कमीत कमी १८ व जास्तीत जास्त ६० वर्षे राहील.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी व शासन निर्णय बघण्यासाठी येथे क्लिक करा.
महासंवाद वेबसाईटवरील माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा.
तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जाणून घेतले आहे कि महिला बचत गट कर्ज योजना लाभ कसा घ्यावा. कोणकोणते कागदपत्रे यासाठी लागतात. तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर नक्की या योजनेचा लाभ घ्या.