अग्निवीर सैन्य भरती मेळावा १३ ते २२ ऑगस्ट दरम्यान औरंगाबाद येथे

अग्निवीर सैन्य भरती मेळावा १३ ते २२ ऑगस्ट दरम्यान औरंगाबाद येथे

अग्निवीर योजना अंतर्गत पहिला १३ ते २२ ऑगस्ट दरम्यान पहिला सैन्य भरती मेळावा औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे.

भारतीय सैन्य दलामध्ये सामील होऊन देश रक्षणाचे अनेक तरुणांचे स्वप्न आता या अग्निवीर योजनेमुळे पूर्ण होणार आहे. अग्निवीर योजना तरुणांमध्ये कमालीची लोकप्रिय ठरत आहे.

महाराष्ट्र राज्यातील पहिली भरती प्रक्रिया पुण्याच्या भरती मुख्यालयाद्वारे आयोजित करण्यात आलेली आहे. हि भरती प्रक्रिया येत्या १३ ते २२ ऑगस्ट या कालावधी मध्ये औरंगाबाद येथे होणार आहे.

अग्निवीर सैन्य भरती मेळावा अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील हि पहिलीच भरती ठरणार आहे.

पुढील लेख पण वाचा घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करणार शिंदे सरकारचा निर्णय

अग्निवीर सैन्य भरती मेळावा प्रवेश पत्र काढून घ्या.

सैन्य भरती कार्यालय औरंगाबाद यांच्या मार्फत प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. ज्या उमेदवारांनी त्यांची नोदंनी केलेली आहे असे उमेदवार हे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

प्रवेशपत्र भरती प्रक्रियेसाठी अनिवार्य करण्यात आलेले आहे. ज्या उमेदवारांकडे हे प्रवेश पत्र नसेल त्यांना या भरती प्रक्रीयेमध्ये सहभाग नोंदविता येणार नाही.

पुढील चार महिन्यामध्ये पुण्यातील सैन्य भरती मुख्याल्याद्वारे आठ भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. आयोजित करण्यात आलेल्या या ८ मेळाव्यामध्ये १ महिला भरती समावेश करण्यात आलेल आहे.

अग्निवीर सैन्य भरती मेळावा अनेक उमेदवार घेणार सहभाग.

या भरती मेळाव्यामध्ये महराष्ट्रातील ७ जिल्ह्यासह गुजरात, गोवा, दादर आणि नगर हवेली, दीव, दमन या केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांना देखील सहभाग घेता येणार आहे.

बातमी पहा

खालील पदांसाठी करण्यात येणार नियुक्ती.

या प्रक्रियेमधून खालील पदांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे.

  • जनरल ड्युटी.
  • तांत्रिक.
  • लिपिक.
  • व इतर विविध पदे.

अधिक माहितीसाठी join indian army या वेबसाईटला भेट द्या. अग्निवीर योजनेला तरुणांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. भारतीय सैन्यदलामध्ये समिल होण्याचे अनेकांचे स्वप्न अग्निवीर योजनेमुळे पूर्णत्वास येत आहे.

अग्निवीर होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक.

देशसेवा करण्यासाठी किंवा अग्निवीर बनण्यासाठी नोंदणी करणे गरजेचे आहे.

नोंदणी करण्यासाठी जॉईन इंडियन आर्मी या वेबसाईटला भेट देवून तरुणांनी त्यांची नोदंनी करणे गरजेचे आहे.

नोंदणी कशी करावी या संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. सर्व सूचना वाचून घ्या आणि योग्य पद्धतीने नोंदणी करा.

अशी करा नोंदणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *