शेतकरी बंधुंनो फायद्याची शेती कशी करावी यावर लक्ष द्या. केवळ अनुदान मिळाले म्हणून समाधानी राहू नका, शेतीला फायदामध्ये कसे आणता हा दृष्टीकोन हवा. अवकाळी पाऊस गारपीट व जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानसंदर्भातील निधी मिळणार असल्याचे दोन शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेले आहेत. मित्रांनो शेती करत असतांना शेतकरी बांधवांना अनेक अडचणी येत असतात. या अडचणीमधील सगळ्यात मोठी अडचण म्हणजे म्हणजे नैसर्गिक संकट होय.
शासनाच्या मदतीने शेतकरी सावरला जाईल का? फायद्याची शेती कशी करावी यावर विचार करा.
कधी अतिवृष्टी तर कधीकधी कोरडा दुष्काळ आणि मध्येच होणारी गारपीठ यामुळे शेतकरी पार कोलमडून गेलेला आहे. मार्च, एप्रिल व मे २०२१ मध्ये मोठ्या प्रमाणावर अवेळी पाऊस व गारपिट झाली होती तसेच जुलै २०२१ या महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती. शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे देखील करण्यात आले होते तर त्या संदर्भातील नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे आणि या संदर्भातील दोन जी आर नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेले आहेत. हि झाली शासनाची डागडुजी परंतु खरच या शासनाच्या मदतीने शेतकरी सावरला जाईल का हा सर्वात मोठा प्रश्न आहे त्यामुळे फायद्याची शेती कशी करावी यावर लक्ष द्या.
फायद्याची शेती कशी करावी हे जाणून घेतल्यास शेतीमध्ये करिअर शक्य आहे.
शेती व्यवसाय हा खूप धोक्याचा झालेला आहे. अवेळी पडणारा पाऊस, गारपीट, अतिवृष्टी असे एक नाहीतर अनेक संकटे शेतकरी बांधवांसमोर उभे आहेत. समजा सर्व संकटामधून शेतकरी बांधव सुखरूप निसटलाच आणि चांगले उत्पन्न घेतले तरी देखील त्याच्या मालाला भाव मिळतो कुठे. जर शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळाला तर नक्कीच शेतकरी प्रगती करू शकेल यामध्ये तीळमात्र शंका नाही आणि मग शेतीला करिअर म्हणून तुम्ही बघू शकता.
शासकीय योजनांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये सामील व्हा
जेंव्हा शेतकरी सुखी होईल तेंव्हाच खऱ्या अर्थाने भारत हा कृषीप्रधान देश होईल.
शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानावर किंवा नुकसानभरपाईच्या निधीवर खूप मोठे राजकारण केले जाते. राजकारणामध्ये पुढारी वेगवेगळी आश्वासने देतात, निवडून येतात आणि शेतकरी फक्त आशेवर राहतो. भारत हा कृषी प्रधान देश आहे असे म्हटले जाते. जर भारत देश हा कृषी प्रधान देश असेल तर आज देशातील शेतकऱ्याची एवढी वाईट परिस्थिती का हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच राहतो. जेंव्हा शेतकरी सुखी होईल तेंव्हाच खऱ्या अर्थाने भारत हा कृषीप्रधान देश होईल.
कधी येतील शेतीला अच्छे दिन
प्रत्येकालाच वाटते माझा मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनिअर व्हावा परंतु कोणालाच वाटत नाही कि आमचा मुलगा शेतकरी व्हावा अर्थात चांगले जीवनमान जगण्याची स्वप्ने पाहणे नक्कीच चांगली बाब आहे परंतु शेतीकडे जर शेवटचा पर्याय म्हणून बघितले जात असेल तर नक्कीच हि दुर्दैवी बाब आहे असे म्हटल्यास अतिशोयोक्ती ठरणार नाही. जेंव्हा इतर करिअर प्रमाणे तरुण शेतीचा विचार करतील तेंव्हाच शेतीला ‘अच्छे दिन’ येतील.
शेती पिकांवर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करणे गरजेचे.
शेतकऱ्यांनी बाजारात जे विकेल तेच पिकविले पाहिजे. पारंपारिक पिके न घेता आधुनिक शेतीची कास धरली पाहिजे. बाजाराचा अभ्यास केला पाहिजे आणि शक्यतो प्रक्रिया उद्योग निर्माण केले पाहिजे. तुम्ही जर मका पिक घेत असाल तर तुमचा कल हा मक्यावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन कसे करता येईल यावर विचार होणे खूपच गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यामध्ये जर शेती करायची असेल तर अभ्यास करून केली पाहिजे तरच शेतीचे भवितव्य चांगले असणार आहे.