Kusum solar pump scheme शेतकऱ्यांसाठी 2 लाख सौर पंप

Kusum solar pump scheme शेतकऱ्यांसाठी 2 लाख सौर पंप

Kusum solar pump scheme व महावितरणच्या माध्यमांतून शेतकऱ्यांना मिळणार २ लक्ष सौर कृषी पंप जाणून घ्या संपूर्ण माहिती.

वीज भारनियमन टाळण्यासाठी आणि शेतीला वेळेत पाणी देण्यासाठी राज्यातील अनेक शेतकरी बांधवानी कुसुम सौर कृषी पंप अर्थात Kusum solar pump scheme योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज केले होते.

WhatsApp Group
WhatsApp Group

बर्याच शेतकऱ्यांनी ऑनलाईन भरलेले आहेत पण काहीना पैसे भरण्याचे मेसेज आलेले नाहीत. काहींना पैसे भरून देखील पंप मिळालेला नाही.

ज्या शेतकऱ्यांनी सौर पंपासाठी पैसे भरलेले आहेत त्यांनी वेगळ्याच वेबसाईटवर पैसे भरलेले आहेत त्यामुळे त्यांची फसवणूक झालेली आहे.

अनेकांना सौर कृषी पंपासाठी पैसे भरण्याचे मेसेज करण्यात आले आणि फसवी लिंक देण्यात आली. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे नंतर कळले.

पुढील माहिती पण कामाची आहे saur urja kusum yojana सौर ऊर्जा कृषी पंपाचे अर्ज पुन्हा सुरु.

Kusum solar pump scheme संदर्भात बैठक

या सर्व बाबींना शेतकरी कंटाळलेले आहेत आणि अशातच म्हणजेच दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी महाउर्जा मंडळाची बैठक घेवून काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत जे कि शेतकरी हिताचे आहेत.

राज्यात kusum solar pump scheme व महावितरणच्या माध्यमातून 2 लाख सौर कृषिपंपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. केंद्र सरकारने सुरु केलेली कुसुम सौर पंप योजना अंतर्गत 1 लक्ष सौर पंप मेडातर्फे तर महावितरणच्या माध्यमातून 1 लक्ष सौर कृषिपंपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

मार्च 2022 पर्यंतचे संपूर्ण पेड पेंडिंग पूर्ण करण्याचे नियोजन सुद्धा करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहे.

भविष्यामध्ये 4 हजार मेगावॅटचे फिडर सौर उर्जेवर आणण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळणार आहे तसेच सबसिडीचा भारसुद्धा कमी होणार आहे.

अधिकृत माहितीसाठी खलील लिंकवर क्लिक करा.

येथे क्लिक करा.

खालील व्हिडीओ पहा.

फिडर बसविण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार भाडे.

फिडर बसविण्यासाठी जी जागा लागणार आहे, त्यासाठीचे भाडे शेतकऱ्यांना देण्यात येणार असून यामुळे शेतकऱ्यांना भाड्याच्या स्वरुपात शाश्वत उत्पन्न देखील मिळणार आहे.

Kusum solar pump scheme योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप हवा असेल त्यांना आता लवकरच हा सोलर पंप मिळणार आहे कारण नव्याने 2 लाख सौर कृषिपंपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले.

शेतकरी बांधवानी फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे कि सौर कृषी पंपाच्या नावाखाली कोणत्याही लिंकवर क्लिक न करता केवळ महाउर्जा वेबसाईटवरील लिंकवरच क्लिक करून अर्ज भरावा जेणे करून त्यांची फसवणूक होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *