Goat farming success story एका शेळीपासून लाखो किमतीच्या शेळ्या

Goat farming success story एका शेळीपासून लाखो किमतीच्या शेळ्या

जाणून घ्या जिद्दी काकूंच्या शेळी पालन व्यवसायाचा प्रवास Goat farming success story. शेतकरी बंधुंनो शेतीमध्ये खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून जर तुम्ही शेळी पालन व्यवसाय केला तर कशा पद्धतीने हा यशस्वी केला जाऊ शकतो हे दाखवून दिले आहे ते भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील सौ. दुर्गाबाई वामनराव गावंडे या काकूंनी. ( यशस्वी शेळी पालन कसे केले जाऊ शकते या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा किंवा येथे क्लिक करा. )

अत्यंत जिद्दी स्वभावाच्या दुर्गा काकू Goat farming success story.

जिद्द असेल तर काय करता येते याचे जातिवंत उदाहरण म्हणजे आमच्या दुर्गा काकू. दुर्गा काकूंचा स्वभावच मुळात स्वाभिमानी. आपले मुले कितीही कमावत असले तरी आपण त्यांच्यावर ओझे होता कामा नये हा विचार त्यांच्या मनात सारखा घोळत असायचा आणि आपण स्वतः स्वाभिमानाने जगण्यासाठी व्यवसाय कसा आणि कोणता करता येईल यावर त्या विचार करत असायच्या. शेळी पालन व्यवसाय यशोगाथा म्हणजेच Goat farming success story आम्ही तुमच्यासाठी घेवून आलेलो आहोत. जेणे करून तुम्हाला हा व्यवसाय करण्यास प्रेरणा मिळेल.

आता गरिबीमध्ये मारायचं नाही शेती फायद्याची करण्यासाठी बघा काय करावे.

नावतच दुर्गा असल्याने काकूंकडे कमालीचे व्यावसायिक धाडस. Goat farming success story.

दुर्गा काकूंनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप गरिबी सोसली. गरीबीचे दिवस असतांनाही त्या कधी लाचार झाल्या नाहीत. जर गरिबीतून बाहेर पडायचे असेल तर शेतीला पूरक व्यवसाय करायला हवा हि खुणगाठ त्यांनी त्यांच्या मनाशी कायमची बांधली आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन आणि कुक्कुटपालन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

अतिवृष्टी नुकसान अनुदान आले. बघा किती मिळणार पैसे

कोंबडीची अंडी विकून घेतली पहिली शेळी Motivational goat farming success story.

दुर्गा काकूंनी सुरुवातीला मोजक्याच कोंबड्या खरेदी केल्या. त्या कोंबड्यापासून त्यांना थोडे थोडे उत्पन्न मिळत गेले. महिलाना बचत करण्याचा गुण हा निसर्गानेच दिलेला आहे काकूंनी कोंबडीची अंडी विकून पैसे बचत केले आणि जमलेल्या पैशातून सुरुवातीला एक शेळी विकत घेतली आणि मग येथूनच सुरु झाला दुर्गा काकूंच्या शेळी पालन व्यवसायास सुरुवात.

इतरांपेक्षा वेगळी कंटोला शेती. जाणून घ्या किती नफा मिळतो या शेतीमध्ये

कुक्कुटपालन व्यवसाय देखील केला यशस्वी.

शेळी पालन व्यवसाय तर काकू करतच आहेत पण या बरोबरीने त्या कुक्कुटपालन व्यवसाय देखील करत आहेत. असे म्हणतात इच्छा असेल मार्ग सापडतोच. कुक्कुटपालन व्यवसायाची कसलीही माहिती नसतांना काकूंनी अगदी मोकळ्या पद्धतीने कुक्कुटपालन व्यवसाय देखील यशस्वी केला.आत्मविश्वास कुमकुमत असणाऱ्या अनेक अडचणी दिसतात मात्र निश्चयाने मार्गक्रमण करणाऱ्यांना रस्ता सापडतोच.

खरीप पिक विमा निधी आला. बघा तुम्हाला किती मिळणार पिक विमा

शेळी पालन व कुक्कुटपालन करण्यासाठी नवऱ्याची मोलाची साथ.

दुर्गा काकूंना शेळी पालन व्यवसाय व कुक्कुटपालन सुरु करण्यासाठी त्यांचे पती वामन नारायण गावंडे व त्यांच्या मुलांनी खूप साथ दिली. मुलांनी सामजिक व राजकीय क्षेत्रामध्ये खूप नाव लौकिक कमविला आहे परंतु या नाव लौकीकांचा त्यांना कसलाही अभिमान नाही किंबहुना मुलांना समाजाची सेवा करण्याचे भाग्य मिळणे हीच खूप मोठी बाब आहे ही कृतज्ञता आजही वामन काका व दुर्गा काकू यांच्याकडून व्यक्त होते.

तुम्ही जर समृद्धी बजेट योजनेसाठी अर्ज केला नसेल तर तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही. लगेच समृद्धी बजेट योजनेसाठी लागणारा अर्ज डाउनलोड करा

बेरोजगारांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन व्यवसाय करावा.

एक एक करत दुर्गा काकूंनी अनेक शेळ्या विकत घेतल्या आणि आज त्यांनी शेळी पालन व्यवसायात चांगलाच जम बसवलेला आहे. आज घडीला त्यांच्याकडे एका शेळी पासून निर्माण केलेल्या लाखो रूपये किमतीच्या शेळ्या आहेत. शेतीमध्ये एकीकडे आत्महत्या, नैराश्य व बेरोजगारी वाढत असतांना दुर्गा काकूंचे शेळी पालन व्यवसायातील यश कोळेगाव आणि कोळेगाव परिसरातीलच नव्हे तर हि माहिती वाचणाऱ्या तमाम आमच्या वाचकांना प्रेरणा देणार आहे यात तीळमात्र शंका नाही.

बेरोजगार तरुणांना उद्योग करण्यासाठी मिळणार १० लाखापर्यंत अनुदान

शेळी पालन व्यवसाय करायचा असल्यास मिळते कर्ज

शेतकरी बंधुंनो तुम्ही देखील हा लेख वाचून शेळी पालन व्यवसाय करण्यास प्रेरित झाले असाल मात्र तुमच्याकडे शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी पैसा नसेल तर तुम्ही शासकीय योजनांचा लाभ घेवून शेळीपालन व्यवसाय उभा करू शकता. नाविन्य पूर्ण योजना हि एक अशी योजना आहे जी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबविली जाते खालील नाविन्य पूर्ण योजनेची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या योजनेसंदर्भात माहिती जाणून घेऊ शकता.

नाविन्य पूर्ण योजनेची संपूर्ण माहिती

शेळी पालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षण घेणे गरजेचे

कोणताही व्यवसाय करायचा झाल्यास त्यासाठी प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. तुम्हाला जर शेळी पालन व्यवसाय यशस्वी करायचा असेल आणि त्यासाठी कर्ज हवे असेल तर शेळी पालन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला जे प्रमाणपत्र मिळते त्याआधारे अनेक बँक तुम्हाला कर्ज देवू शकतात. पूर्वी कोणतेही प्रशिक्षण घ्यायचे झाल्यास त्या ठिकाणी चार ते पाच दिवस राहावे लागत असे परंतु आता अनेक शासन मान्यता असलेल्या संस्था हे प्रशिक्षण ऑनलाईन सुद्धा देत आहेत.

व्यवसाय यशस्वी करण्यासाठी खालील बाबी लक्षात ठेवा.

  • तुमचे ध्येय ठरवा.
  • ध्येय पूर्ण करण्यासाठी योजना तयार करा.
  • एकाग्रचित्ताने तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी मार्गक्रमाण करा.
  • नकारात्मक लोकांकडे किंवा त्यांच्या टीकांकडे दुर्लक्ष करा.
  • नेहमी सकारात्मक राहा.
  • नेहमी स्वतः स्पर्धा करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *